शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅपमधील संदेशने बयाणात घेतली अनेकांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

पोलीस पथक आता संदेशने बयाणात दिलेल्या नावांचा शोध घेणार आहे. फसवणूक होऊनही त्या व्यक्तींनी तक्रार का दिली नाही याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्याशिवाय संदेशने नागपूर शहरातून काही दागिन्यांची खरेदी केली होती. त्याचाही तपास केला जाणार आहे. पोलीस तपासात हनी ट्रॅपमध्ये होरपळलेल्या इतर जणांची नावे उघड करण्याचा प्रयत्न होणार आहे. जेणे करून त्यांची झालेली फसगत व ती रक्कम संदेशने कुठे खर्च केली, याचाही शोध घेतला जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिल्लीतील सर्जनला दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या संदेश मानकरने पोलिसांना दिलेल्या बयाणातून मोठा गौप्यस्फोट होणार आहे. सोशल मीडियावर मॉडल म्हणून अनन्यासिंग ओबेरॉय या नावाने संदेश वावरत होता. त्याने अनेक हायप्रोफाइल व्यक्तींना आपल्या नादाला लावले होते. यातून त्याने अनेकांची फसवणूक केली. ती नावे त्याने पोलिसांपुढे सांगितली आहेत. आता याचा शोध पोलीस घेत आहेत. न्यायालयाने संदेश अनिल मानकर याला हनी ट्रॅप प्रकरणात ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यामुळे मंगळवारी तपास अधिकारी एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांनी संदेशला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आणखी सात दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयात केली. संदेशने पोलिसांना बयाणामध्ये कुणाकुणाला फसविले याची माहिती दिली. त्याचाही तपास करणे आवश्यक असल्याचे कारण पुढे करून वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने पाच दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली. पोलीस पथक आता संदेशने बयाणात दिलेल्या नावांचा शोध घेणार आहे. फसवणूक होऊनही त्या व्यक्तींनी तक्रार का दिली नाही याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्याशिवाय संदेशने नागपूर शहरातून काही दागिन्यांची खरेदी केली होती. त्याचाही तपास केला जाणार आहे. पोलीस तपासात हनी ट्रॅपमध्ये होरपळलेल्या इतर जणांची नावे उघड करण्याचा प्रयत्न होणार आहे. जेणे करून त्यांची झालेली फसगत व ती रक्कम संदेशने कुठे खर्च केली, याचाही शोध घेतला जाणार आहे. थंड डोक्याने टाकतोय जाळे- संदेश मानकर हा मॉडेलच्या नावाने सोशल मीडियाचे अकाउंट चालवून हायप्रोफाइल व्यक्तींना गंडा घालत होता. हा गुन्हा करण्यासाठी तो अतिशय थंड डोक्याने व्यूहरचना आखत होता. संयम दाखवत पुढच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करूनच आपले उद्दिष्ट साध्य करीत होता. त्याच्या या हनी ट्रॅप प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, यावरही पोलीस भर देत आहे. अजूनही एकट्या संदेशनेच हे नेटवर्क उभे केले नसावे, असा अंदाज आहे. त्याची खातरजमा झाल्यानंतरच पोलीस तपासाची दिशा ठरणार आहे.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅप