लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली असून याविरोधात काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असल्याने महागाई वाढली आहे. तसेच घरगुती गॅसच्या दरातही कमालीचे वाढ झाली असून गृहिणीचे आर्थिक बजेट बिघडले आहे. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असतानाही ती खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी एपीएमसीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जि.प.सदस्या अरूणा खंडाळकर, पं.स.सभापती शितल पोटे, जि.प.सदस्य अनिल देरकर, वसंतराव आसुटकर, शरीफ अहेमद शफिक अहेमद, यावदवराव काळे, विलास वासाडे, रवींद्र धानोरकर आदींनी तहसीलदारांकडे केली आहे.
महागाईविरोधात मारेगाव काँग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:04 IST