शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

मराठी माणसाची शाळा देणार शिक्षणाला नवी दिशा; वडनगरमधून देशाचा ‘प्रेरणा उत्सव’

By अविनाश साबापुरे | Published: April 14, 2024 5:48 AM

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडविण्यासाठी ‘प्रेरणा उत्सव’ राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या व्हर्नाक्युलर शाळेची निवड केली आहे. येथे देशभरातील विद्यार्थ्यांना आठवडाभर प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाचे नवे वारे पोहोचविले जाणार आहेत. या निमित्ताने एका मराठी माणसाची शाळा देशभरातील शिक्षणव्यवस्थेला दिशा दाखविणार आहे.

नाशिकमध्ये जन्मलेल्या आणि नंतर बडोदा संस्थानचे सर्वाधिकारी झालेल्या सयाजीराव गायकवाड यांनी १८८८ साली वडनगरमध्ये (गुजरात) व्हर्नाक्युलर शाळा स्थापन केली होती. प्राचीन भारतीय वारसा आणि आधुनिक शिक्षणपद्धती अशा दोहोंची सांगड घालून या शाळेत शिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘प्रेरणा उत्सवा’साठी या शाळेची निवड केली आहे. प्रेरणा उत्सवासाठी प्रत्येक राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय हे नोडल सेंटर आहे. महाराष्ट्रातही नवोदय विद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   

उत्सव काय आहे? - विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत  सात दिवस देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. - यामध्ये सर्व राज्यांतील सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळासह सर्वच शाळांमधील नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे. जुनी परंपरा, देशाचा वारसा आणि आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान यांची सांगड या प्रशिक्षणात असेल. - प्रत्येक आठवड्याला देशाच्या कोणत्याही एका प्रांतातील २० विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत ठेवले जाणार आहे.

काय शिकविणार? प्रेरणा उत्सवातील सात दिवसांचा अभ्यासक्रम गांधीनगर आयआयटीने तयार केला आहे. नऊ मूल्यांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. स्वाभिमान आणि विनय, शौर्य आणि साहस, परिश्रम आणि समर्पण, करुणा आणि सेवा, विविधता आणि एकता, सत्यनिष्ठा आणि शुचिता, नवाचार आणि जिज्ञासा, श्रद्धा आणि विश्वास, स्वातंत्र्य आणि कर्तव्य या नऊ मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाईल. 

अशी होणार विद्यार्थ्यांची निवड येत्या १७ एप्रिलपर्यंत कोणत्याही एका दिवशी शाळास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड होईल. या दोन विद्यार्थ्यांना २३ एप्रिलला जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेसाठी पाठविले जाईल. ही निवड प्रक्रिया परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयात होईल. तेथे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वडनगर (गुजरात) येथील प्रेरणा उत्सवासाठी पाठविले जाणार आहे. तेथील एका आठवड्याच्या शिक्षणानंतर त्यांच्या अनुभवाचा आधार घेतला जाईल. 

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा