शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेचे अनेक गाळे लिलावाअभावी पडूनच

By admin | Updated: April 11, 2015 23:59 IST

येथील नगरपरिषदेचे जवळपास दुकाने ३५ गाळे गेल्या कित्येक वर्षांपासून लिलावाअभावी पडून आहे.

आर्थिक नुकसान : काहींनी सुरू केला मोफत वापरवणी : येथील नगरपरिषदेचे जवळपास दुकाने ३५ गाळे गेल्या कित्येक वर्षांपासून लिलावाअभावी पडून आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे.नगरपरिषदेने आयडीएसएमटी व इतर निधीतून बांधकाम केलेले गाळे, यापूर्वी लिलाव करूनही भाड्याने न गेलेले गाळे, नव्याने भाडे ठरविण्यात आलेले गाळे नगरपरिषदेच्या मालकीचे आहेत. त्यांचा लिलाव न झाल्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील आरक्षण क्रमांक १४ मधील गाळ्यांचा लिलाव न झाल्यामुळे त्याचा मोफत वापर काही नागरिक करताना दिसून येत आहे. हे गाळे सन १९९८ मध्येच बांधून तयार झाले होते. मात्र त्यांचा लिलावच करण्यात आला नाही. परिणामी हे गाळे अद्याप तसेच पडून आहे. त्याचा उप्योग आता काही नागरिक करीत आहे. मात्र त्यापासून नगरपरिषदेला छदामही मिळत नाही. परिणामी लाखो रूपये खर्चन बांधलेले हे गाळे आता शोभेचेच ठरले आहे.यासोबतच आरक्षण क्रमांक ७९ मधील नगरपरिषदेच्या निधीतून बांधलेल्या १८ पैकी केवळ एक गाळा भाड्याने देण्यात आला आहे. उर्वरित १७ गाळेधारकांनी पैसेच भरले नाही. मात्र त्यापैकी काहींनी लिलावात बोली बोलताना अनामत रक्क्म जमा केली होती. आता त्यांच्या अनामत रकमेतून काही पैसे कापून ते नव्याने लिलाव करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे गाळेसुद्धा रिकामे पडून असल्याने त्यापासून नगरपरिषदेला कोणताही आर्थिक लाभ होत नाही. सोबतच आरक्षण क्रमांक ७८ मधील आयडीएसएमटी योजनेअंतर्गत १८ गाळ्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र ते गाळेही अद्याप हर्रास करण्यात आले नाही. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. लाखो रूप्ये खर्च करून नगरपरिषदेने विविध निधीतून या गाळ्याची् निर्मिती केली. त्यांचा लिलाव करून त्यापासून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्न मिळवून देणे, असा हेतू होता. मात्र हा मूळ हेतूच आता बाजूला सारला गेला आहे. परिणामी गाळे तयार असूनही नगरपरिषदेला आर्थिक लाभ होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेने केलेली गुंतवणूक निरर्थक ठरली आहे. त्यापासून काहीच मिळकत होत नसल्याने नगरपरिषदेचे आर्थिक बाजूही कमकुवत होत आहे. त्यासाठी आता नव्याने या सर्व गाळ्यांचा लिलाव करण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)या संदर्भात नगरपरिषदेचे आरोग्य सभापती व मनसेचे गटनेते धनंजय त्रिंबके यांनी नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. त्यातून त्यांनीही या सर्व गाळ्यांचा नव्याने लिलाव करण्याची मागणी केली आहे. तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक दोनसमोरील पहिला माळ्यावरील गाळेधारकांनी पैसे भरले नसल्यास ते गाळे खाली करून ते हर्रास करावे, अशी मागणीही त्रिंबके यांनी केली आहे. आता किमान त्यांच्या मागणीला तरी नगरपरिषदेकडून होकार मिळतो किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. विशेष म्हणजे सत्तारूढ प२ाच्या सभापतीलाच निवेदन देऊन गाळे हर्रास करण्याची मागणी करावी लागत आहे.