वणीत वाहतूक नियंत्रणासाठी मनसैनिक रस्त्यावर; अभिनव आंदोलनाने वाहतूक नियंत्रण विभागात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:33 IST2021-01-16T12:32:51+5:302021-01-16T12:33:11+5:30
या अभिनव आंदोलनामुळे वणीच्या वाहतूक नियंत्रण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वणीत वाहतूक नियंत्रणासाठी मनसैनिक रस्त्यावर; अभिनव आंदोलनाने वाहतूक नियंत्रण विभागात खळबळ
यवतमाळ : वारंवार तक्रारी करूनही वणी शहराची वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यात येथील वाहतूक नियंत्रण शाखेला अपयश आल्याने अखेर शनिवारी मनसैनिक वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरले. या अभिनव आंदोलनामुळे वणीच्या वाहतूक नियंत्रण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
एकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असताना दुसरीकडे वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी गावाबाहेरच्या चौफुलींवर वाहनधारकांकडून पैसे वसुल करतात, असा मनसेचा आरोप आहे. हा प्रकार बंद करून शहराची वाहतूक व्यवस्था सुधारावी, अशी मागणी मनसेने केली आहे.