शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरराव नाईक यांच्या मताधिक्यात वाढ की घट ?

By admin | Updated: October 18, 2014 02:04 IST

पुसद विधानसभा मतदारसंघासाठी १९ आॅक्टोबरला मतमोजनी असली तरी २००९ च्या तुलनेत १.६७ टक्के मतदान कमी झाले असून, यावेळी ६१.२३ टक्के मतदान झाले आहे.

पुसद : पुसद विधानसभा मतदारसंघासाठी १९ आॅक्टोबरला मतमोजनी असली तरी २००९ च्या तुलनेत १.६७ टक्के मतदान कमी झाले असून, यावेळी ६१.२३ टक्के मतदान झाले आहे. त्यात पंचरंगी निवडणूक झाल्याने मनोहरराव नाईकांना किती मताधिक्य मिळेल याविषयी केवळ कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर मतदारांचीसुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुसद विधानसभा निवडणुकीसाठी भरघोस मतदान होईल असा आशावाद असताना केवळ ६१.२३ टक्के मतदान झाल्याने अनेकांची राजकीय गणिते चुकु लागली आहे. २००९ च्या निवडणुकीत ६२.९० टक्के मतदान झाले होते. यंदा २०१४ च्या निवडणुकीत १.६७ टक्के मतदान कमी झाले आहे. ६२ वर्षांपासून पुसद मतदारसंघावर नाईक कुटुंबीयांची एकछत्री पकड आहे. दोन दिवसात अनेक बाबी उजेडात आले. सर्व काही स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपासह एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चार वेळा आमदार राहिलेले मनोहरराव नाईक पाचव्यांदा यावेळी रिंगणात होते. काँग्रेसकडून अ‍ॅड़ सचिन नाईक , भाजपाचे वसंतराव पाटील-कान्हेरकर, सेनेचे प्रकाश पाटील देवसरकर आदींनी ही निवडणूक लढविली. पुसद मतदारसंघात २ लाख ८१ हजार ५६१ एकूण मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार ३८९ मतदान झाले. ही टक्केवारी ६१.२३ एवढी आहे. २००९ च्या मतदानाचा आलेख बघितला. मनोहरराव नाईक ७७ हजार १३६ मते मिळाली होती. तर सेनेच्या डॉ. आरती फुफाटे यांना ४६ हजार २९६ मते मिळाली होती. त्यावेळी दोन्ही काँग्रेसची आघाडी व सेना-भापाची युती होती. यावेळी मात्र सर्वजण स्वतंत्र होते. त्यामुळे मताचे मोठे विभाजन झाले. तरी सुद्धा मनोहरराव नाईकांचे पारडे जड राहणार आहे. मनोहरभाऊ ६० ते ७० हजाराच्या मताधिक्क्याने विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यासाठी ७८ हजार ३७१ मतदान आवश्यक आहे. तेव्हा एकूण १५ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांची अनामत जप्त होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकंदरीत २००९ च्या निवडणुकीचा विचार केल्यास ज्यावेळी मनोहरराव नाईक यांच्या मताधिक्क्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)