शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा नगरपरिषदेला थेट मनेका गांधींचा फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:01 IST

संचारबंदीत घराबाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, रहिवासी भाग सुनसान आहे. परिणामी नागरिकांनी टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणाऱ्या भटक्या श्वानांचे हाल सुरू आहे. अन्न, पाण्यावाचून त्यांची तडफड होत आहे. सुभाष रणवीर या संवेदनशील व्यक्तीच्या निदर्शनास ही तडफड दिसली.

ठळक मुद्देश्वानांची मदत भावली : सेवाव्रती कार्याची दखल घेण्याची ग्वाही

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : लॉकडाऊनच्या काळात येथील पालिकेचे आरोग्य निरीक्षक शहरातील भटक्या श्वानांना अन्न पुरवीत आहे. त्यांना उपचारार्थ औषधदेखील देत आहे. त्यांच्या या सेवाव्रती कार्याची दखल घेत थेट माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार मनेका गांधी यांनी भ्रमणध्वनी करून माहिती घेत आरोग्य निरीकांचे कौतुक केले.एवढ्या मोठ्या व्यक्तीने पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.सुभाष रणवीर, असे आरोग्य निरीक्षकांचे नाव आहे. खासदार मनेका गांधी यांनी या कार्याबद्दल केवळ रणवीर यांचे कौतुकच केले नाही, तर या कार्याची दखल घेण्याची ग्वाही दिली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात छोटे-मोठे उद्योग, अत्यावश्यक वगळता इतर दुकान बंद पडले. लघु व्यावसायिक, कामगार, मजुरांवर उपासमारीची वेळ आली. माणसांच्या मदतीकरिता शेकडो हात पुढे येत आहे. मात्र मुक्या प्राण्यांचे पोट कसे भरेल, असा प्रश्न आहे.संचारबंदीत घराबाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, रहिवासी भाग सुनसान आहे. परिणामी नागरिकांनी टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणाऱ्या भटक्या श्वानांचे हाल सुरू आहे. अन्न, पाण्यावाचून त्यांची तडफड होत आहे. सुभाष रणवीर या संवेदनशील व्यक्तीच्या निदर्शनास ही तडफड दिसली. त्यांनी लगेच सेवाकार्य सुरु केले. दररोज पोळ्या तयार करून ते शहरात फिरून भटक्या श्वानांना पोळ्या टाकतात. त्यामुळे भुकेने व्याकूळ झालेल्या मुक्या प्राण्यांना दिलासा मिळाला. तसेच सध्या बहुतांश श्वान विविध आजारांनी त्रस्त असल्याचे आढळल्यावर रणवीर यांनी त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले. त्यांचे हे कार्य बघून एका व्यक्तीने व्हीडीओ तयार केला. हा व्हीडीओ मनेका गांधी यांना ई-मेलद्वारे पाठविला. त्यांनी इ-मेल बघताच थेट रणवीर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. त्यानंतर १४ एप्रिलला दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी ११२३३५९२४१ या भ्रमणध्वनीवरून रणवीर यांना कॉल आला.‘मी खासदार वरुण गांधी बोलतोय, मम्मी आपल्याशी बोलणार आह, असा पलिकडून आवाज आला. लगेच समोरून चक्क मनेका गांधी बोलू लागल्या. श्वानांना मदत केल्याबद्दलचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे त्या म्हणाल्या. त्याबद्दव रणवीर यांना धन्यवाद दिले. तसेच आरोग्य विभागामार्फत चालणाºया कामकाजाची माहिती घेतली. एवढेच नव्हे, तर रणवीर यांच्या कार्याची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. या फोनमुळे मानवांसह प्राण्यांची सेवा करण्यास अधिक उर्जा मिळाल्याचे सुभाष रणवीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नगरपरिषदेचेही कौतुकखासदार मनेका गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सुरू केलेल्या उपाययोजनांची रणवीर यांच्याकडून माहिती घेतली. मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी प्रभागनिहाय नियोजन केले. सफाई, युपीएल मशीन, अग्निशमन यंत्राद्वारे जंतूनाशक फवारणी केली. या बाबी रणवीर यांनी गांधी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मनेका गांधी यांनी मुख्याधिकारी तसेच नगरपरिषदेच्या कार्याचेही कौतुक केले.

टॅग्स :Socialसामाजिक