शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मांगलादेवीत भिंत कोसळून वृद्धा ठार

By admin | Updated: July 9, 2016 02:34 IST

जिल्ह्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : अतिवृष्टीचा इशारा यवतमाळ : जिल्ह्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाने नदी-नाले तुडुंब झाले असून नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे पावसाने भिंत कोसळून वृद्ध महिला ठार झाली. मांगलादेवी येथील पार्वताबाई शंकर सहारे (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पार्वताबाई घराशेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पावसामुळे खिळखिळी झालेली गोठ्याची मातीची भिंत कोसळली. त्या खाली पार्वताबाई दबल्या. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. तत्काळ नेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे पार्वतीबाईचा पुतण्या अविनाश याचा विवाह रविवारी यवतमाळात आहे. त्यासाठी त्या सहपरिवार जाणार होत्या. परंतु त्यापूर्वीच काळाने डाव साधला. त्यांच्या मागे दोन मुले व मुलगी आहे. पावसामुळे बळी जाण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होय. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. कधी रिमझीम तर कधी जोरदार पाऊस बरसत होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणातही गारठा निर्माण झाला आहे. नागपूर वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात १० तारखेपर्यंत अतिवृष्टी होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस बरसत आहे. आतापर्यंत मासिक सरासरीच्या ५१ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पावसाने जलस्रोत वाढले असून तलावातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. काही नाल्यांना पूर आले आहे. मांगलादेवीची घटना वगळता जिल्ह्यात कुठेही नुकसानीची माहिती नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. (शहर वार्ताहर) पावसाचा जोर कायम गत २४ तासात म्हणजे ८ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३.८ मिमी पाऊस कोसळला. त्यात यवतमाळ ८.४०, बाभूळगाव ७, कळंब ५, नेर २, घाटंजी ५, राळेगाव १६, वणी ५, मारेगाव ५, झरी जामणी ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकरी सुखावला जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला.