शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

गुणवंता रामभाऊ गेडाम रा.डोंगरखर्डा ता.कळंब असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने ३ जून २०१७ रोजी अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. रावेरी कॅनल पुलाखाली तिच्यावर अत्याचार केला. अश्लिल फोटो काढून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. हा सर्व घटनाक्रम आरोपीचा मामेभाऊ नीलेश मडावी याने पाहिला. राळेगाव पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक ए.एन. सोळंके यांनी गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

ठळक मुद्देडोंगरखर्डाची घटना : प्रत्यक्षदर्शी व पीडितेची साक्ष ठरली महत्वाची

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ट्यूशनवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला मेटीखेडा येथील ऑटो पाईंटवरून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केला. यातील नराधमाला मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांनी  दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. गुणवंता रामभाऊ गेडाम रा.डोंगरखर्डा ता.कळंब असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने ३ जून २०१७ रोजी अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. रावेरी कॅनल पुलाखाली तिच्यावर अत्याचार केला. अश्लिल फोटो काढून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. हा सर्व घटनाक्रम आरोपीचा मामेभाऊ नीलेश मडावी याने पाहिला. राळेगाव पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक ए.एन. सोळंके यांनी गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डब्ल्यू. चव्हाण यांनी पीडिता, प्रत्यक्षदर्शी नीलेश मडावी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरविले. बाललैंगिग शोषण कायद्यानुसार आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता नीती दवे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला.अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. यातील आरोपींना शिक्षा कधी होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया होऊन मंगळवारी या प्रकरणात निकाल देण्यात आला. त्यात आरोपीला दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या काही दिवसात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारCourtन्यायालय