शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात २९ ला महामोर्चा

By admin | Updated: September 28, 2016 00:26 IST

बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात येत्या २९ सप्टेंबरला यवतमाळात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बसपासह ३५ संघटना : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची गरज नाही, विविध प्रमुख सात मागण्यायवतमाळ : बहुजन समाज पक्ष, अनुसूचित जाती-जमाती हक्क संरक्षण समितीच्या नेतृत्वात येत्या २९ सप्टेंबरला यवतमाळात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा कुणाहीविरूद्ध नसून आपल्या न्याय मागण्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी असल्याचे येथील विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी स्पष्ट केले. या मोर्चाव्दारे २६ जानेवारी २0१५ च्या सुधारित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती-जमातीकरिता असलेला अनुशेष त्वरित भरावा, त्यांना सरकारी नोकऱ्यांमधील पदोन्नतीत आरक्षण द्यावे, बोगस आदिवासींची चौकशी करून कठोर कारवाई करावी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबद्दल रंगनाथन मिश्रा आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच सच्चर समितीच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्यात, मुस्लीम समाज अत्याचार प्रतिबंधक कायदा तयार करून लागू करावा आणि अनुसूचित जाती-जमातीच्या वसतगिृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्या करण्यात येणार आहे.हा मोर्चा कुणाच्याही विरूद्ध नसून प्रशासनाला समस्या लक्षात आणून देण्यासाठी आहे. देशात मुस्लीम, आदिवासी, दलितांवर अत्याचाराचे वातावरण निर्माण झाले असून ते निवळावे, असा हेतू आहे. हा मोर्चा शांतीपूर्वक होणार असून ३५ विविध संघटनांचा सहभाग राहणार असल्याचे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, प्रदेश सचिव पंडित दिघाडे यांनी सांगितले. अ‍ॅट्रोसीटी कायद्यात बदलाची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा कायदा लागू झाल्यानंतर नागपुरात मनोरमा कांबळे हत्याकांड झाले. मात्र आरोपी निर्दोष सुटले. खैरलांजी प्रकरणात आरोपींना भादंविअंतर्गत अटक झाली. मात्र अ‍ॅट्रोसीटीमधून ते निर्दोष सुटले, असे अनेक प्रकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधीलकी जोपासून या मोर्चात सहकटुंब सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला बळीराम नेवारे, अजय घोडाम, प्रफुल गेडाम, संजय तरवरे, दिलीप नेहारे, बाळकृष्ण गेडाम, लक्ष्मण पाटील, दयानंद बनसोड, प्रफुल शंभरकर, धर्मपाल माने, काशिनाथ ब्राम्हणकर, बाबाराव मडावी, अजय शेंडे, शैलेश गाडेकर, कोडापे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)मोर्चात सहभागी संघटनाआदिवासी अन्याय निवारण समिती, गोंड गोवारी सेवा मंडळ, गोंडवाना संग्राम परिषद, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, गोंडवाना गणतंत्र पार्टी, क्रांतिवीर शामादादा कोलाम समाज संघटना, आदिवासी परधान समाज संघटना, बंजारा क्रांती दल तथा राष्ट्रीय विमुक्त महासंघ, भीम टायगर सेना, आॅल इंडिया कौमी तंजीम, आदिवासी मुक्ती दल, राष्ट्रीय मातंग महासंघ, क्रांतिवीर शामादादा कोलाम सामाजिक संघटना, आदिवासी विद्यार्थी संघ, बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय रवीदास परिषद, गुरू रवीदास विचार मंच, बिरसा ट्रस्ट, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, आदिवासी गोवारी समाज संघटना, विदर्भ मातंग युवक संघटना, मांग गारोडी समाज जागृती मंच, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, ओबीसी क्रांतीदल, तेली समाज महासंघ, भारतीय पिछडा समाज संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, दलित-मुस्लीम आदिवासी एकता महासंघ, अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद, सम्राट अशोक ग्रुप, आदिवासी गोवारी समाज विकास कृती समिती, लोक स्वराज्य आंदोलन, कोलाम समाज युवक संघटना.