शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

माहूरमध्ये केंद्राच्या निधीअभावी घरकूल योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 05:00 IST

नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते.  येथे आजपर्यंत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्य शासनाकडून १८ लाख ८८ हजार, तर केंद्र शासनाकडून ४० लाख ८० हजारांचा निधी मिळाला.

ठळक मुद्देपावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : सर्वांसाठी घरे, या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र, एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली आहे. केंद्राच्या निधी अभावी योजना रखडली आहे.नव्याने घरकूल मंजूर झालेले लाभार्थी ही योजना फसवी असल्याचे याेजनेकडे पाठ फिरविताना दिसत आहेत.  शहरी भागात प्रत्येक लाभार्थ्याला अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यात केंद्र शासनाचे दीड लाख, तर राज्य शासनाचे एक लाखाचे अनुदान असते.  येथे आजपर्यंत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्य शासनाकडून १८ लाख ८८ हजार, तर केंद्र शासनाकडून ४० लाख ८० हजारांचा निधी मिळाला.कोरोनाच्या प्रादुर्भावात लाभार्थी आर्थिक संकटात सापडले असताना अनेकांनी गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. पैशाअभावी काहींची कामे अर्धवट राहिली. आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळतील, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही १०० टक्के अनुदान मिळाले नाही. काहीचे हप्ते न मिळाल्याने  बांधकाम थांबले आहे. एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घर भाड्याचा भार, यामुळे लाभार्थी  आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. नगरपंचायतकडे विचारणा केल्यावर केंद्राचा निधी आला नसल्याचे उत्तर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र रोष व्यक्त होत आहे.शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यात ८२ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ६८ लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून प्राप्त होणारे ४० हजारांप्रमाणे दोन हप्ते व केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून ६० हजारांचा एक हप्ता, असे १ लाख ४० हजार रुपये तीन टप्प्यात मिळाले. दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या २६५ लाभार्थ्यांपैकी १६८ लाभार्थ्यांना राज्य सरकारचे दोन हप्ते प्राप्त झाले. मात्र, केंद्राचा निधी मिळाला नाही. तिसऱ्या टप्प्यात मंजूर ५०० लाभार्थ्यांना अद्याप एकही हप्ता मिळाला नाही. 

सहा टप्प्यात मिळतोय अडीच लाखांचा निधीयोजनेंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात. त्यात राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ४० टक्के, तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. केंद्र शासनाच्या दीड लाखातून पहिल्या टप्प्यात ६०, दुसऱ्या २० तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो. अशा सहा टप्प्यात निधी वितरित केला जातो.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना