शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खैरी येथील महावीर भवन ही समाजासाठी मोठी उपलब्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

खैरीसारख्या छोट्याशा गावात भव्य असे महावीर भवन निर्माण झाले. ही समजासाठी मोठी उपलब्धी आहे. धार्मिक, अध्यात्मिक संस्कार आजही भारतीयांच्या मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. अध्यात्मिक विचारांची ही महाज्योत महानगरांतून छोट्या गावांपर्यंत प्रज्वलित झाली आहे. ती महाज्योत ज्ञान संस्काराने प्रत्येकाचे मन उजळून टाकत आहे, असे विचार लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविजय दर्डा : भवनाचे लोकार्पण, वीणादेवी दर्डा सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खैरीसारख्या छोट्याशा गावात भव्य असे महावीर भवन निर्माण झाले. ही समजासाठी मोठी उपलब्धी आहे. धार्मिक, अध्यात्मिक संस्कार आजही भारतीयांच्या मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. अध्यात्मिक विचारांची ही महाज्योत महानगरांतून छोट्या गावांपर्यंत प्रज्वलित झाली आहे. ती महाज्योत ज्ञान संस्काराने प्रत्येकाचे मन उजळून टाकत आहे, असे विचार लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.खैरी (ता. राळेगाव) येथे रविवारी विजय दर्डा यांच्या हस्ते महावीर भवनाचे लोकार्पण तसेच वीणादेवी जवाहरलाल दर्डा सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. ते म्हणाले, खैरी येथे जैन धर्मीयांची लोकसंख्या अत्यल्प आहे. पण त्यांनी येथे महावीर भवन निर्माण करण्याचे ठरविले, त्यासाठी विविध ठिकाणच्या समाजबांधवांची मदत घेतली. आज हे भवन पूर्ण झाले. त्यात माझ्या आईच्या नावाने एक सभागृह बांधण्यात आले. त्यातून माझ्या आईच्या आठवणींना उजाळा मिळाला. या भवनासाठी मी खासदार निधीतून १० लाखांचा निधी दिला होता. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने भवनासाठी आवश्यक जागा दिली नाही. त्यामुळे तो निधी परत गेला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.खैरी येथील जैन श्रावक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. अशोक उईके, खैरीच्या सरपंच झोनिता मेश्राम, ज्येष्ठ संपादक एस.एन.विनोद, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, वडकीचे ठाणेदार प्रशांत गिते, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, प्रकाशचंद धारीवाल, जैन श्रावक संघ नागपूरचे माजी उपाध्यक्ष शांतीलाल झामड, खैरी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश झामड, नरेश मुथा, प्रकाशचंद मुथा, नवलचंदजी कोठारी, सचिन कोठारी, विनोद नहार, राळेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशचंद झामड, नंदू गांधी आदी उपस्थित होते. (आणखी वृत्त/४)खैरीच्या मातीशी जुनेच नातेविजय दर्डा म्हणाले, खैरी गावाशी माझे जुनेच नाते आहे. या मातीसोबत माझा जिव्हाळा आहे. हे माझ्या आईच्या मामाजीचे गाव असल्याने बालपणाची काही काळ मी इथे घालविला आहे. आम्ही दमणीत, रेंगीत बसून यवतमाळवरून इथे यायचो. येथील धबधबा पाहण्याची मजाही काही औरच होती. म्हणून खैरीचे नाव निघाल्यावर आजही माझे मन बालपणात रममाण होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा