शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

सुपर स्पेशालिटीच्या धर्तीवर अतिदक्षता कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 22:00 IST

मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही लाजवेल असा सुसज्ज आणि वातानुकूलित अतिदक्षता कक्ष येथील शासकीय रूग्णालयात निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय : वातानुकूलित व उपचाराची अत्याधुनिक सुविधा, गोरगरीब रुग्णांना लाभ

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही लाजवेल असा सुसज्ज आणि वातानुकूलित अतिदक्षता कक्ष येथील शासकीय रूग्णालयात निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील रूग्णांना त्याचा लाभ होत आहे.शासकीय रूग्णालयाचे नाव घेतले की, श्वास नकोसा करणारी दुर्गंधी... थुंकीच्या पिचकाºया... काळवंडलेल्या भिंती.. घरघर करणारे पंखे आणि त्यापेक्षा रूग्णांचा त्रागा करणारे डॉक्टर-कर्मचारी असे दृश्य नजरेसमोर येते. कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच असा अनुभव येतो. प्रसन्न वातावरणात डॉक्टर, कर्मचारीसुद्धा मन लावून काम करतानाचे दृष्य अभावानेच पहायला मिळते. मात्र आता यात बदल होत असून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता उपचार कक्षात (आयसीसीयू) मोठा बदल झाला आहे. यामुळे या कक्षात येताच कुणालाही सुपर स्पेशालिटी रूग्णालयात आल्याचा भास होत आहे. शासकीय रूग्णालयात अधिष्ठात्यांच्या कक्षासमोरच नवीन आयसीसीयू साकारण्यात आला आहे. या कक्षात १२ बेडची व्यवस्था असून संपूर्ण कक्ष वातानूकूलित आहे. त्यात नऊ सेंटर मॉनिटरींग युनिट, तर दोन व्हेंटींलेटर आहे. हृदयरूग्ण आणि तापाने गंभीर रूग्णंवर येथे उपचार केला जातो. विषबाधा व सर्पदंशाच्या रूग्णांवर जुन्या आयसीसीयूमध्ये उपचाराची सुविधा आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी डॉक्टर, नर्स यांच्यावरील ताण कमी झाला.बंदूकधारी सुरक्षा रक्षकाचा खडा पहारामेडिसीन विभागांतर्गत हा आयसीसीयू कक्ष असून त्याचा दर्जा वृद्धींगत करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड व विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी परिश्रम घेतले. नवीन आयसीसीयूचा दर्जा कायम राहावा, यासाठी कठोर नियम तयार केले गेले आहे. त्यानुसार रूग्णासोबत या कक्षात एकाही नातेवाईकाला थांबू दिले जात नाही. केवळ अतिशय गंभीर रूग्णाजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची सूट आहे. बंदुकधारी सुरक्षा रक्षकाचा पहारा असल्याने गर्दीही होत नाही. या कक्षाचा दर्जा कायम राहावा, यासाठी रूग्णालय प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज आहे.