शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या राखेतून शोधले जाते जीवन-मरणाचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

माणूस कसा जगतो आणि तो कुठल्या परिस्थितीमध्ये जगतो, याची जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या पाठाचा परिचय देत असताना, कुणाची उपजीविका कशावरती राहील हे काही सांगता येत नाही. प्रेताला जाळत असताना प्राचीन काळामध्ये तोंडामध्ये सोन्याचा मणी किंवा अंगावरती सोन्याच्या दागिन्यांचा तुकडा हेच स्मशानामध्ये वास्तव्य करणाऱ्या मसणजोगी समाजाचं उपजीविकेचे साधन होतं. 

ठळक मुद्देमसणजोगी समाजाची पोटासाठी भटकंती

किशोर वंजारी लोकमत न्यूज नेटवर्कनेर : "यहापे सब शांती शांती है" या उक्तीप्रमाणे जीवन-मरणाचा मार्ग अक्षरशः प्रेताच्या राखेतून शोधण्याचा प्रकार मानवाच्या संवेदना जाग्या करणारा आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, हे जेव्हा माणसाला गवसलं तेव्हा त्याने आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केलेत. जगण्याचे संदर्भ बदलले. माणूस कसा जगतो आणि तो कुठल्या परिस्थितीमध्ये जगतो, याची जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या पाठाचा परिचय देत असताना, कुणाची उपजीविका कशावरती राहील हे काही सांगता येत नाही. प्रेताला जाळत असताना प्राचीन काळामध्ये तोंडामध्ये सोन्याचा मणी किंवा अंगावरती सोन्याच्या दागिन्यांचा तुकडा हेच स्मशानामध्ये वास्तव्य करणाऱ्या मसणजोगी समाजाचं उपजीविकेचे साधन होतं. समाज बदलला संदर्भ बदलले आणि माणसं बदलली. प्रेताच्या सोबत आता कमरेला असणारा करदोडासुद्धा दिला जात नाहीत. त्याला कंबरपट्टा म्हटलं जातं. त्यामुळे  स्मशानात आलेल्या प्रेतासोबत असते ती फक्त जळल्यानंतरची राख. आज स्मशानातील प्रेताची विल्हेवाट करीत असताना फुटी कवडीही दिसत नाही. एकीकडे प्रचंड अठराविश्व दारिद्र्य तर दुसरीकडे माणसांच्या जीवनामध्ये बदलते संदर्भ या कुटुंबाचा उदरनिर्वाह बदलून गेले.  आयुष्य समर्पित करण्यासाठी केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे. नेर येथील पवन जयस्वाल यांनी आम्हाला मायेचा हात दिला आहे. आम्हास आज मदतीची गरज असल्याचे रामाराव एलाप्पा घनसरवार म्हणाले. स्मशानभुमीतील व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपविले. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. या कुटुंबाने माणुसकीचं नातं संपूर्ण शहरांशी जोडलेलं आहे, असे मत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी मांडले. हा समाज विकासाच्या प्रवाहात यावा, यासाठी शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

स्मशानभूमीत राहून करतात गुजरानआज प्रत्येकाचा व्यवसाय ठरलेला आहे. परंतु एक अशी जमात आहे, कि ज्यांना कुठलेही भय नाही. स्मशान जोगी समाजातील असाच एक परिवार भटकत नेर स्मशानभूमीत पोहोचला आहे. रामाराव एल्लाप्पा घनसरवार व त्यांच्या कुटुंबातील चांदु रामाराव घनसरवार, दुर्गा चांदु घनसरवार, आशा चांदु घनसरवार हा परिवार नेर स्मशानभूमीमध्ये राहून आपल्या परिवाराची गुजराण करीत आहे. मसणजोगी  समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी आम्हीही माणसेच आहोत, आणि स्मशानामध्ये आलेली मृत व्यक्ती ही आमचेसाठी देवरूपी आत्मा असल्याची प्रतिक्रिया रामाराव एलाप्पा घनसरवार यांनी नोंदविली.