शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक हमाल-मापाऱ्यांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

प्रक्रियेसोबतच तूर खरेदीही नाफेडमार्फत सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी सुरू होणार आहे. मात्र या प्रक्रियेत परवानाधारक हमाल आणि मापाऱ्याना घ्यायचे नाही, अशी खेळी काही ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही बाजार समित्यांमध्ये परवानाधारक हमाल-मापाऱ्यांमार्फतच तुरीचे मोजमाप व्हावे, यासाठी आग्रह धरला जात आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांची खेळी : तूर उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती, ऑनलाईन नोंदणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परवानाधारक हमाल आणि मापाऱ्यांना तूर खरेदीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यापाऱ्याची ही खेळी यशस्वी झाल्यास तूर उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. सहकार विभागाने यात आताच हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.शेतकऱ्याची तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसोबतच तूर खरेदीही नाफेडमार्फत सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी सुरू होणार आहे. मात्र या प्रक्रियेत परवानाधारक हमाल आणि मापाऱ्याना घ्यायचे नाही, अशी खेळी काही ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही बाजार समित्यांमध्ये परवानाधारक हमाल-मापाऱ्यांमार्फतच तुरीचे मोजमाप व्हावे, यासाठी आग्रह धरला जात आहे.व्यापाऱ्यांकडून त्यांचे हित पाहणारे हमाल-मापारी ठेवले जातात, अशी ओरड आहे. वजनात दांडी मारली जाते. हलका-भारी अशी प्रतवारी करून दरात लुबाडणूक होते, अशी ओरड शेतकऱ्यांमधून होते. हिच खेळी व्यापाºयांकडून खेळली जाते. परवानाधारक हमाल आणि मापारी ठेवल्यास निरीक्षकांच्या उपस्थितीत शेतमालाचे मोजमाप केले जाते. शेतमालाचे वजन झाल्यानंतर पावती तयार करण्यात येते.निरीक्षक, शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती यांच्याकडे या पावत्या सोपविल्या जातात. शेतकऱ्याला काही संशय आल्यास तो दाद मागू शकतो. व्यापाऱ्यांच्या हमालांकडून काहीही नुकसान झाले तरी, दाद मागण्याची काहीही सोय नाही. हीच बाब शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी परवानाधारक हमाल-मापारीच असावे, असा आग्रह धरला जात आहे.नाफेड, सीसीआय, व्यापारी यापैकी कुणीही शेतमाल खरेदी करो. मोजमाप करण्यासाठी परवानाधारकच हमाल-मापारी असले पाहिजे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तशी तरतूद कायद्यातही करण्यात आली आहे.- अरविंद देशमुख,अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा हमाल, मापारी कामगार संघटना

टॅग्स :agricultureशेती