शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मजूर म्हणतात, गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

Yawatmal News १९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले.

ठळक मुद्देबगीचा सजविणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मनात दाटली खंतजगविलेली झाडे झाली मरणासन्न

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मूल जन्माला येते तेव्हा ते गोड दिसते, त्याचे कौडकौतुक होते. पण मोठे होताना संगत चुकली तर हेच गोड लेकरू समाजाच्या तिरस्काराचे कारण बनते... यवतमाळातील बगीच्यांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. सौंदर्य विद्रूप झाले. पण हे बगीचे ज्या मजुरांनी स्वत:च्या हाताने सजविले, वाढविले, त्यांच्या दु:खाला तर पारवारच नाही. ते म्हणतात, वाळलेली झाडं पाहून पोटची पोरं उपाशी असल्यासारखे वाटते...एक हीच शंका माझीअजूनही फिटेनागाव हे फुलांचे होतेका बकाल झालेसुरेश भटांच्या या गझलेसारखाच आज सर्वसामान्य यवतमाळकरांच्या मनालाही प्रश्न पडला आहे.१९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले. नियोजन आणि कष्ट यांच्या संगमाने स्मशानभूमी एवढी देखणी झाली की, लोक येथे डबापाटीर्साठी येऊ लागले. शिक्षक शाळेच्या विद्यार्थ्यांची छोटी सहल येथे आणू लागले. यवतमाळच्या देखण्या स्मशानाची कीर्ती संपूर्ण जिल्हाभर पसरली. याच काळात गोधनी मार्गावरील नेहरू मंच, नगरभवनपुढील गार्डन, शिवाजी बाल उद्यान, नेहरू बाल उद्यान हे बगीचेही सुरावार आणि त्यांच्या मजुरांनी फुलविले, प्रसिद्ध केले.

या बगीच्यांनी यवतमाळच्या वैभवाला हिरवी श्रीमंती दिली. पण कालांतराने हे मजूरही दुर्लक्षित झाले अन् बगीचेही अडगळीत पडले. प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी अनास्था दाखविल्यामुळे आज हे बगीचे बेजान बनले आहेत. साहजिकच आता तिकडे कुणीही फिरकत नाही. सब फुलो के हैं दिवाने.. काटो से दिल कौन लगाये.. अशी या बगीच्यांची अवस्था आहे. झाडं सुकली, झुकली, मेली. त्यांना जगविणारे मजूरही आज कामं शोधत आहेत. पण त्यांच्यावर कुणाचीच नजर नाही गेली. सुरावार यांच्या आश्रयाला राहून राबणारे हे मजूर लॉकडाऊनच्या काळात तर रोजगाराला अगदीच मोताद झाले आहेत. नगरपालिकेने पुन्हा बगीच्यांना फुलवावे आणि मजुरांनाही रोजगार द्यावा, अशी अपेक्षा आहे.

रखरखीत जमिनीला हिरवेगार करण्याची क्षमता मजुरांमध्ये आहे. मात्र वाळवंट बनत चाललेल्या बगीच्यांना वाचविण्याची इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वामध्ये आहे का हा प्रश्न आहे. उत्तर सकारात्मक असेल तरच हिरवाई टिकेल.सहा लाख झाडांची पुण्याईरोजगार म्हणून बाग फुलविणाऱ्या विठ्ठल सुरावार यांनी झाडांना पोरासारखे जपले. आजवर सहा लाखांवर झाडे लावली. या झाडांचीच पुण्याई म्हणून आज माझी मुले एलएलबी, इंजिनिअरिंगसारखे शिक्षण घेऊ शकले, अशी कृतज्ञता सुरावार यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Socialसामाजिक