शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

‘कुमारी माता’ हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न

By admin | Updated: January 15, 2017 01:01 IST

कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे.

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी : जीवनात दु:ख आले तर निसर्गाशी मैत्री करा
अविनाश साबापुरे  यवतमाळ
कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे. जेव्हा सर्व पुरुष स्वत:ची सामाजिक जबाबदारी स्वाकारतील, तेव्हाच तो सुटू शकेल. खरे तर, मुलांना आज सेक्स एज्युकेशन देणे अत्यंत गरजेचे आहे. पण मुले-मुली वयात येणे या बाबीकडे सध्या एखाद्या गुन्ह्याप्रमाणेच पाहिले जात आहे, असे रोखठोक मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
शनिवारी यवतमाळ येथे रोटरी क्लबच्या ‘एज्युफेस्ट’ कार्यक्रमाकरिता आल्या असता सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली. त्यात यवतमाळच्या लोकांविषयी त्या भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, इथले शेकडो तरुण-तरुणी, महिला-पुरुष आज मला भेटले. त्यांच्यात एक सळसळता उत्साह जाणवला. त्यांच्या वागण्यात अरेरावी नव्हती, तर सहजपणा होता. इथली माणसं ज्या आपुलकीने भेटली, ती आपुलकी मनाला जाऊन भिडणारी होती.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी महिलांना सोनाली कुलकर्णी यांनी खूप मार्मिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘गाभ्रीचा पाऊस’मध्ये मी ज्या महिलेची भूमिका केली, तशा हजारो महिला या जिल्ह्यात आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे. मनुष्यजन्म भाग्याने मिळतो. तो कुणीही गमावता काम नये. मनात थोडासाही निराशेचा सूर उमटला तर आठवावे की, आपण पशू नाही माणूस आहोत. कोणत्याही परिस्थितीवर आपल्याला मात करता येते. आपल्या घरातला माणूस निराश दिसला तर त्याला धीर द्या. त्याच्याशी मोकळे बोला. स्त्रीच्या बोलण्यात ताकद असते. तीच पूर्ण घर नियंत्रित करू शकते. जीवनात दु:ख वाटले तर निसर्गाशी मैत्री करा. तो आपल्याला जगणे शिकवत असतो.
आयुष्यात पहिल्यांदाच मी यवतमाळला आले. पण इथल्या शेतकऱ्यांसाठी मी वारंवार येणार आहे. आमीर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या फाउंडेशनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही परिसरांची निवड झाली आहे. तेथे जनजागृतीसाठी मी नक्की येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, समाजातील अंधश्रद्धा मिटविणे या उद्देशानेही येथे येईल, अशी ग्वाही शेवटी सोनाली कुलकर्णी यांनी दिली.

गोडच नव्हे, सत्यही बोला... हॅपी मकरसंक्रांती!
अभिनेत्री असले म्हणून काय झाले? इतरांप्रमाणे मीही मकरसंक्रांती साजरी करते. या सणाला मी काळ्या रंगाचा मान ठेवते. काळीच साडी घालते. तिळाचे लाडू करून वाटते. पण केवळ परंपरा पाळण्यापेक्षा माझा सण थोडा वेगळा आहे. मकरसंक्रांती वाणीवर ताबा ठेवायला शिकवते. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणजे तेच. पण नुसते गोडच का बोला? सत्यही बोला. आप्तस्वकीयांना समजून घ्या. मी यवतमाळात मकरसंक्रांतीच्या दिवशी आले, इथल्या महिलांना माझा हाच संदेशरूपी वाण समजा... अशा ओघवत्या शैलीत उत्तरे देतानाच सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, हॅपी मकरसंक्रांती!