शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कोची प्रकल्पाचे काम रखडले

By admin | Updated: April 10, 2015 00:12 IST

घाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सुदाम दारव्हणकर रूंझाघाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोची तलावाच्या कामांना २००८ मध्ये सुरूवात करण्यात आली. हा प्रकल्प २०११ मध्ये पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र २०१० मध्ये या तलावाचे काम बंद पडले. त्यानंतर हा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. दोन वर्षाच्या कालावधीत फक्त धरणाच्या बांधाची मातीकाम आणि पुच्छ कालवा तयार झाला आहे. धरणाची तोंडी, वेस्टवेअर, कालवा हे काम होणे बाकी आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून १६५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ७० हजार रुपये एकराप्रमाणे मोबदला देण्यात आला. या प्रकल्पाचे पाणी कोची, शिवणी, जरंग, जरूड, वृंदावन टाकळी या गावातील ९१५ हेक्टरमध्ये पोहोचणार आहे. प्रकल्पाचे कंत्राट पुणे येथे जगदाणी कंपनीने घेतले. या प्रकल्पावर १७ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्याबदल्यात एक थेंब पाणीसुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शाश्वत शेती करण्यासाठी सिंचनाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मात्र कोची प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी शासनाच्या उदासिन धोरणामुळे दुर्दैवी ठरत आहे. सिंचन प्रकल्पाचे काम कधीच वेळेत पूर्ण केले जात नाही. लाभक्षेत्रासोबतच बुडीत क्षेत्रातीलही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची मालिकाच सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. लहान-मोठ्या सर्वच प्रकल्पांबाबत अतिशय दुर्लक्षीत धोरण राबविले जात असल्याने यात अधिकारी, कंत्राटदार गब्बर होत आहे.