शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कामठवाडाने जिंकले १० लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:49 PM

कामठवाडा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातून १० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात गावाला पाणीदार बनविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा : आदर्श गावाचा पाणीदार प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : कामठवाडा गावाने ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धेत दारव्हा तालुक्यातून १० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात गावाला पाणीदार बनविण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यवतमाळपासून २१ किमी अंतरावरील कामठवाडा हे १२३९ लोकवस्तीचे असून बहुतांश भाग कोरडवाहू आहे. या शेतीला समृद्ध करण्यासाठी लोकसहभागातून जल पुनर्भरणाची प्रक्रिया गावकऱ्यांनी राबविली. शेतशिवारात ढाळीचे बांध, नाला खोलीकरण, शोषखड्डे निर्मिती, डिप सीसीटी, पेयजलाच्या विहिरीलगत शेततळे, नाला बांधबंदिस्ती, वृक्षारोपण, परसबाग ही कामे ४० दिवसांत गावकऱ्यांनी पुर्ण केली. लोकसहभागातून दीड किलोमिटरचा नाला खोल करून जिवंत करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या या परिश्रमाला पुरस्काराने पावती मिळाली. ११ आॅगस्टला पुण्यात १० लाखांचा हा प्रथम पुरस्कार सिने अभिनेता अमिर खान यांच्या हस्ते आणि सत्यजीत भटकर, किरण राव यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. कामठवाडाच्या सरपंच रेखा उमेश उके आणि ग्रामसेविका मनिषा बेले यांनी हा पुरस्कार स्विकारला.कडक उन्हातही राबले गावकरी७ एप्रिल ते २५ मे हा कडक उन्हाळ्याचा स्पर्धेचा कालावधी होता. तेव्हा ४५ अंश तापमानतही गावकºयांनी काम केले. सरपंच रेखा उमेश ऊके, ग्रामसेविका मनिषा बेले, उमेश उके यांचा पुढाकार मोलाचा राहिला. आकाश ढंगारे, प्रितम काळे, सुमित परचाके, सुमित ठोकळ, संदेश लोणारे, महेश टाले, निलेश परचाके, सपना परचाके, पुनम परचाके, सविता भुजाडे, सविता ऊके, तिमाजी घोडेस्वार, पवन काळे, शाम शिंदे, स्पर्धेचे समन्वयक पंकज चव्हाण, राजू कांबळे, योगेश बोबडे यांचे परिश्रम महत्वाचे ठरले. यापुर्वी गावाला आदर्श गाव, निर्मलग्राम पुरस्कार मिळाले आहेत. वॉटर कप स्पर्धा जिंकल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पुरस्काराचा हा क्षण आयुष्यातील ऐतिहासिक होता. गावाच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. पुढेही असेच चांगले काम घडावे यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.- रेखा उमेश उके, सरपंच, कामठवाडा

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा