जेसीबीचा वीज तारांना स्पर्श, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:05 IST2018-10-10T00:05:25+5:302018-10-10T00:05:55+5:30
एका ट्रकमधून कामाच्या ठिकाणी जेसीबी नेत असताना सदर जेसीबीला वीज तारांचा स्पर्श झाला. यात ट्रकचालक जागीच ठार, तर क्लिनर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नांदेपेरा ते रांगणा मार्गावर घडली.

जेसीबीचा वीज तारांना स्पर्श, एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एका ट्रकमधून कामाच्या ठिकाणी जेसीबी नेत असताना सदर जेसीबीला वीज तारांचा स्पर्श झाला. यात ट्रकचालक जागीच ठार, तर क्लिनर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नांदेपेरा ते रांगणा मार्गावर घडली.
या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचताच नागरिक शांत झाले. या परिसरात वीज खांबावरील तारा लोंबकळत असून त्यातूनच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. राजनाथ राजेश्वर उडाव (२३) असे मृताचे नाव आहे, तर या दुर्घटनेत त्याचा सहकारी क्लिनर जावेद हा जखमी झाला. नांदेपेरा-रांगणा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठीच् एका ट्रकद्वारे हा जेसीबी नेला जात होता. याचवेळी या मार्गावरील आडव्या वीज तारांना जेसीबीचा स्पर्श झाला. त्यामुळे चालक राजनाथ उडाव हा ट्रकखाली उतरल्याने त्याला विजेचा शॉक लागून तो घटनास्थळीच ठार झाला. मृताच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. दरम्यान, ठाणेदार बाळासाहेब खाडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकºयांशी चर्चा केली.