शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

जवखेड दलित हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

By admin | Updated: November 6, 2014 02:19 IST

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खालसा जवखेड या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील मोकाट आरोपींचा तत्काळ शोध घेवून ...

पुसद : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खालसा जवखेड या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील मोकाट आरोपींचा तत्काळ शोध घेवून त्यांना बेड्या ठोकाव्या तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून क्रूरकर्मा मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघासह विविध संघटनांनी बुधवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विविध संघटनांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अब्दुल रऊफ शेख यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. दलित समाजाच्या जाधव कुटुंबातील तिघांची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण हत्या केली. ही घटना लोकशाहीला मारक अशी आहे. घटनेला मोठा कालावधी उलटला असताना पोलीस मारेकऱ्यांचा शोध लावू शकले नाही, मग अटक तर दूरचीच बाब. पोलिसांचा नाकर्तेपणा आणि घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शासनाबद्दल प्रचंड रोष आणि नारेबाजी व्यक्त करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसील प्रशासनाला मोर्चातील शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. मोर्चात रिपब्लिकन सेनेचे तालुका प्रमुख संजय इंगोले, परिवर्तन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बळवंत मनवर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष इंदल राठोड, समीर कदम, गणपत गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सवंगडे, प्रेम ढोके, बाबूराव वाघमारे, राजू वाढे, किशोर भगत, अशोक बलखंडे, मुकुंद थोरात, किसन पतंगे, गजेंद्र मुळावकर, शांताबाई धुतडे, सूमन जमदाडे, संतोषी भगत, देवराव हरणे, विजयकुमार कांबळे, पंजाबराव सरदार, तातेराव मानकर, बाबूराव नवसागरे, बाबा खान, शेख जमीर आदींसह शेकडो नागरिकांनी व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)