वधूमंडपी वरात पोहोचलीच नाही

By Admin | Updated: May 19, 2014 23:58 IST2014-05-19T23:58:36+5:302014-05-19T23:58:36+5:30

गाव आर्णी... मंगल कार्यालय... वधू मंडळी नवरदेवाच्या प्रतीक्षेत... मुहूर्त निघून गेला... वºहाड्यांमध्ये चलबिचल... वरात पोहोचलीच नाही...

It has not reached the age of bride | वधूमंडपी वरात पोहोचलीच नाही

वधूमंडपी वरात पोहोचलीच नाही

हुंड्यासाठी वधू पित्याची ऐनवेळी अडवणूक

घाटंजी : गाव आर्णी... मंगल कार्यालय... वधू मंडळी नवरदेवाच्या प्रतीक्षेत... मुहूर्त निघून गेला... वºहाड्यांमध्ये चलबिचल... वरात पोहोचलीच नाही... अखेर वधू मंडळी पोलीस ठाण्यात... नवरदेवासह आठ जणांवर गुन्हा. हा प्रकार घडला आहे तालुक्याच्या भांबोरा येथील राठोड कुटुंबाशी. भांबोरा येथील सवाई रूपला राठोड यांच्या मुलीचा साखरपुडा २८ डिसेंबरला उमरी इजारा येथील अंबादास सोमला चव्हाण यांच्या मुलाशी पार पडला. त्यावेळी वर मुलाला दोन तोळ्याची सोन्याची चेन आणि एक तोळ्याची अंगठी देवून लग्नाची तिथी काढण्यात आली. १९ मे, वेळ सकाळी १०.४९ वाजता विवाह मुहूर्त आर्णी येथील रेणूका मंगल कार्यालयात ठरला. मात्र दोन दिवसांपूर्वी वर मंडळींकडून पाच लाख रोखेची मागणी करण्यात आली. याशिवाय लग्न होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे वधुपित्याने वरमंडळींना भांबोरा येथे चर्चेसाठी बोलाविले. परंतु ही मंडळी मानन्यास तयार नव्हती. तरीही वधुपित्याने लग्नकार्यानंतर ही रक्कम देण्यास होकार दिला. वरमंडळींनीही ही बाब मान्य केली. त्यामुळे विवाह सोहळ्यासाठी आर्णी येथे वधूमंडळी पोहोचली. परंतु लग्नाचा मुहूर्त निघून गेल्यानंतरही वरात आली नाही. अखेर दुपारी सवाईराम राठोड यांनी घाटंजी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी नवरदेव निशांत अंबादास चव्हाण (२८), अंबादास सोमला चव्हाण (६५), नीलेश अंबादास चव्हाण (४०), अर्चना नीलेश चव्हाण (३५) रा.उमरी इजारा, अमोल अंबादास चव्हाण (३२), मयूरी अमोल चव्हाण रा.राधाकृष्ण नगरी आर्णी, नामदेव सोमला चव्हाण (५२), पंकज नामदेव चव्हाण (२५) रा.उमरी इजारा यांच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध विविध कलमांसह हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: It has not reached the age of bride