शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील खचलेली कडा अपघातास आमंत्रण

By admin | Updated: November 8, 2014 01:46 IST

पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे...

पुसद : पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या ठिकाणचा रस्ता अरुंद असून वाहनचालकास हा रस्ता अनोळखी असल्यास केव्हाही अपघात होऊ शकतो. यवतमाळ-मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद इत्यादी दैनंदिन प्रवासी वाहतूक होणाऱ्या या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. पुसद-वाशिम मार्गावर सारखी रहदारी असते. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांपासून तर पुण्या-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स्ची दररोज ये-जा असते. खंडाळा घाटात ऐन वळणावरच ठिकठिकाणी रस्त्याच्या कडा खचलेल्या आहेत. वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतात रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खचलेल्या कडांचा अंदाज येत नाही. घाटाचा रस्ता असल्याने एखाद्या वाहनाचे चाक रस्त्याच्या खाली उतरले तर मोठा अपघात होऊ शकतो. गेल्या सहा महिन्यात कित्येक अपघातांची नोंद झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली पावसाळ्यात नादुरुस्त रस्त्यांचे अहवाल संबंधित उपअभियंत्यांकडून मागविण्यात आले होते. ‘लोकमत’मध्ये खचलेल्या कडांचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर बांधकाम विभागाने मध्यंतरी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून घाटातील कडा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. प्रशासकीय यंत्रणेचे किरकोळ कामाकडे वारंवार दुर्लक्ष असून मोठ्या कामांनाच प्राधान्य देण्यात येत आहे. कोट्यवधींचा निधी येऊनही या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीची कामे हाती घेतली खरी, परंतु चित्र काही वेगळेच दिसते आहे. रस्त्याच्या डागडुजीचे कंत्राट देणाराकडे संबंधित कामाची सर्वस्वी जबाबदारी असते. सदर कंत्राटदाराकडून काही दोष राहिल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करावी लागते. कडा खचून पडलेल्या खड्यांमुळे एखादा अपघात घडल्यास त्या ठेकेदाराला दोषी ठरविण्याचे शासनाचे नियम आहेत. गत सहा महिन्यांपासून या रस्त्यांवर काही चारचाकी व अनेक दुचाकी वाहनचालकांचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूला आमंत्रण देत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची कुठलीही कारवाई झालेली नाही. परिणामी अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)