शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

वाळीत टाकण्याच्या भीतीतून ऑनरकिलिंग

By admin | Updated: May 15, 2014 23:55 IST

अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, एवढेच नाही तर जात पंचायत वाळीत टाकेल. त्यामुळे दोन मुलींचे लग्न कसे करावे या भीतीतून संगीताचा कायमचा काटा

यवतमाळ : अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, एवढेच नाही तर जात पंचायत वाळीत टाकेल. त्यामुळे दोन मुलींचे लग्न कसे करावे या भीतीतून संगीताचा कायमचा काटा काढल्याची कबुली मारेकरी आजोबा आणि मामाने दिली. तसेच पारवा पोलिसांपुढे दोघांनी घटनेचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.

घाटंजी तालुक्यातील बोधडी येथील संगीता बाबूलाल गाडेकर या तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. तिचा खून आजोबा काशीराम भवान्या टेकाम आणि मामा शाम काशीराम टेकाम यांनी केल्याचे पोलीस तपासात पुढे आले. १६ फेब्रुवारीपासून संगीता रहस्यमयरीत्या बेपत्ता होती. त्यानंतर २८ फेब्रुवारीला एका मुलीचा मृतदेह पाटापांगरा येथील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह संगीताचाच असल्याची खात्री पटवायला तब्बल साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर गोपनीय माहिती आणि संशयावरून आजोबा काशीराम व मामा शाम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही संगीताचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.

काशीराम आणि शाम ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजात जात पंचायत भरते. एखाद्या कुटुंबातील मुलीचे अनैतिक संबंध पुढे आल्यास पंचायत त्या कुटुंबाला वाळीत टाकते. त्यानंतर वाळीत टाकलेल्या कुटुंबातील मुलीशी कुणीही बोलतसुद्धा नाही तेव्हा लग्न तर दूरचीच बाब. संगीताच्या बाबतीतही नेमके हेच झाले. काशीराम आणि शाम या दोघांना तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मात्र ती याबद्दल काही एक सांगत नव्हती. त्यामुळे संगीताचे अनैतिक संबंध समाजाला माहीत झाले तर आपल्याला वाळीत टाकले जाईल, शिवाय संगीताच्या दोन बहिणींशी कुणीही लग्न करणार नाही, अशी भीती काशीराम आणि शामला होती. त्यातूनच आपण संगीताचा खून केल्याची कबुली पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी.एस. महाजन आणि पारवा ठाणेदार संजय शिरभाते यांच्यापुढे त्यांनी दिली. तसेच घटनेचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. (स्थानिक प्रतिनिधी)