शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पीडित मुलींसाठी मनोधैर्य योजना

By admin | Updated: November 11, 2015 01:51 IST

पीडित महिला, मुली व बालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने नुकतेच आक्टोबर २०१३ मध्ये ही योजना सुरू केली.

मंगेश वरकडजिल्हा माहिती अधिकारीपीडित महिला, मुली व बालकांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने नुकतेच आक्टोबर २०१३ मध्ये ही योजना सुरू केली. महिला, बालकांवर वाईट प्रसंग ओढवल्यास त्यांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे योजनेंतर्गत मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यभरातील पीडित महिला तसेच मुलींना मोठा आधार मिळाला आहे. ही योजना अतिशय व्यापक आहे.निकष, नियम, अटी : महिला, बालकावर अत्याचार झाल्यानंतर तक्रारीवरून पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतर मदतीसाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हा क्षतिसहाय्य व पुनवर्सन मंडळाकडे अर्ज करावा लागतो. मंडळाकडे अर्ज सादर झाल्यानंतर तातडीने मदत देता यावी म्हणून मंडळाची बैठक बोलावून मदत मंजूर केली जाते. पीडित महिला, बालकास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत वैद्यकीय सेवा पुरविली जाते. योजनेचे स्वरूप : महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालक यांना पुन:स्थापक न्यायाची खात्री देण्यासाठी सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतंर्गत बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी किमान २ लाख व विशेष प्रकरणामध्ये ३ लाख अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांना ५० हजार इतके अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे. मंजूर अर्थसहाय्य अनुदान उपलब्धतेनुसार संबंधित लाभार्थ्यास अदा केले जाते. अ‍ॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यासही मदत दिली जाते. अर्ज कोठे करावा : महिला, बालकांवर अत्याचाराचे प्रकरण उद्भवल्यास त्याची पोलिसात तक्रार नोंदविली जाते. सदर प्रकरणात एफआयआर नोंद झाल्यानंतर मदतीसाठीचा प्रस्तास संबंधित पोलीस ठाण्यामार्फत तयार केला जाते. तो प्रस्ताव त्या पोलिस ठाण्यामार्फतच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास प्राप्त होतात. त्यानंतर सदर प्रस्ताव जिल्हा क्षतिसहाय्य व पुनवर्सन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर केला जातो. संबंधित कार्यालय व संपर्क : सामूहिक विवाह सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, तहसील चौक यवतमाळ येथे ९०११२९४२५१ किंवा ०७२३२-२४६९२१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.संबंधित अधिकारी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, तहसील चौक, यवतमाळ