शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा कार्यालयातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

By admin | Updated: October 21, 2016 02:14 IST

२०१५-१६ या वर्षात आयोजित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या तब्बल २३ लाख रुपयांच्या

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : एसीबी चौकशीसाठी क्रीडा संघटना आग्रहीयवतमाळ : २०१५-१६ या वर्षात आयोजित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या तब्बल २३ लाख रुपयांच्या निधीत जिल्हा क्रीडा कार्यालयाने केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध २५-३० क्रीडा संघटना एकवटल्या आहेत. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदन देऊन या प्रकरणाची एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत’ने माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे २२ सप्टेंबरपासून ‘पंचनामा शालेय क्रीडा स्पर्धांचा’ या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या बातम्यांचा संदर्भ घेऊन विविध क्रीडा संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. गतवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या कर्यकाळात जिल्हा व तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी शासनाकडून २३ लाख रुपयांचा निधी आहे. त्यापैकी १७ लाख ६६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी हडपण्यासाठी संयोजकांनी चहा-पाणी, नाश्ता व पंचांच्या मानधनावर थोडे थोडके नव्हे तर लाखोंचे बिल काढले. काही स्पर्धा तर केवळ कागदोपत्रीच घेतल्या. बोगस क्रीडा साहित्य खरेदी, मजुरीच्या नावावर हजारोंची बनावट देयके, बनावट पंचगिरी, खोटे नाव व स्वाक्षऱ्या करून लाखोंचा निधी लाटल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले. या प्रकाराने क्रीडा क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. खेळाडू व पंचाच्या हक्काच्या व घामाच्या पैशांचाही क्रीडा कार्यालयाने भ्रष्टाचार केला. क्रीडा संघटनांनी याविरुद्ध दाद मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, केवळ स्पर्धा आयोजन या एकाच योजनेत एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर क्रीडांगण विकास, युवक कल्याण, व्यायामशाळा, पायका आदी अन्य योजनांच्या अनुदान वाटपातही मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य योजनांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर अ‍ॅथलेटिक्स, सॉफ्टबॉल, कबड्डी, कुस्ती, बास्केटबॉल, खो-खो, तलवारबाजी, कॉर्फ बॉल, डॉज बॉल, रस्सी खेच, रोलर स्केटींग, म्युझिकल चेअर, स्पोर्ट्स डान्स, जिल्हा रेफरी बोर्ड, फुटबॉल, कॉन्टी क्रिकेट, हँडबॉल, पॉवर लिफ्टिंग, थ्रो बॉल, फुटबॉल टेनिस, सॉफ्ट टेनिस, कराटे, तेंग शुडो, सिकई मार्शल आर्ट, बास्केटबॉल आदी खेळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. (क्रीडा प्रतिनिधी)