शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

वणीत ‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

या आजारावर वेळीच उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. गवतात आढळणाऱ्या स्क्रबच्या डंखामुळे रूग्णांची प्रकृती हळूहळू खालावते. सुरूवातीला फार लक्षणे आढळत नाही. मात्र उपचार न केल्यास शरिरातील एकेक अवयव निकामी होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देदोन रूग्ण आढळले : एकावर सेवाग्रामच्या रूग्णालयात उपचार सुरू, एकाची प्रकृती ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अतिशय गंभीर स्वरूपाच्या असलेल्या स्क्रब टायफस या आजाराने वणीत शिरकाव केला आहे. शहरात दोन रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे.यातील एका रूग्णावर चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती ठणठणीत झाली. त्यानंतर त्याला सुटी देण्यात आली. मागील आठवड्यात पुन्हा एक रूग्ण आढळून आला असून त्याच्यावर सेवाग्रामच्या रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. दोन वर्षांपूर्वी वणीतील एका महिलेचा स्क्रब टायफसने नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या आजारावर वेळीच उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. गवतात आढळणाऱ्या स्क्रबच्या डंखामुळे रूग्णांची प्रकृती हळूहळू खालावते. सुरूवातीला फार लक्षणे आढळत नाही. मात्र उपचार न केल्यास शरिरातील एकेक अवयव निकामी होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या किटकाचे वास्तव्य गवतात असते. त्यामुळे गवतात जास्त फिरू नये. शेतात काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. दररोज सायंकाळी शेतातून आल्यानंतर आंघोळ करावी.- डॉ.विकास कांबळे,तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी

टॅग्स :Healthआरोग्य