शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्यात नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरचा अडथळा

By admin | Updated: September 10, 2016 00:59 IST

नादुरूस्त ट्रान्सफार्मरमुळे शेतकऱ्यांना ओलित करताना अडचणी येतात. सद्या ट्रान्सफार्मरचा तुटवडा नाही.

बदलून देण्याचे आदेश : बारा तास वीज पुरवठ्याचे नियोजनयवतमाळ : नादुरूस्त ट्रान्सफार्मरमुळे शेतकऱ्यांना ओलित करताना अडचणी येतात. सद्या ट्रान्सफार्मरचा तुटवडा नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मर नादूरूस्त आहे, तेथे तातडीने दुसरे बदलवून द्या, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. मुख्यमत्र्यांनी कृषीपंपांसाठी दररोज सलग बारा तास वीज देण्याची घोषणा केली. परंतु त्यामध्ये जिल्ह्यातील नादुरूस्त ट्रान्सफार्मर अडथळा ठरत आहेत. महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील वीज व्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता विजय भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात नादुरूस्त ट्रान्सफार्मरच्या अनेक तक्रारी वारंवार प्राप्त होतात. ट्रान्सफार्मर नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे सिंचन बाधीत होते. सिंचनाची सुविधा आहे, परंतु वीज पुरवठा व्यवस्थित नसल्याने सिंचन करता येत नाही, अशी स्थिती ठिकठिकाणी निर्माण होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी प्राप्त होतात. जिल्ह्यात सध्या पुरेशा प्रमाणात ट्रान्सफार्मर उपलब्ध आहे. त्यामुळे अशी तक्रार प्राप्त झाल्यास २४ किंवा जास्तीत जास्त ४८ तासात नवीन ट्रान्सफार्मर लागले पाहिजे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. ट्रान्सफार्मर तातडीने बदलवून देता यावे यासाठी मुबलक प्रमाणात त्याचा साठा असणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त ट्रान्सफार्मर मागवून ठेवा. नादुरूस्त ट्रान्सफार्मर तातडीने दुरूस्त केले जावे, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. शासनाने कृषि पंपांना सलग १२ तास अखंडीत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली आहे. याचे चांगले नियोजन करण्याची सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. सद्या उघाडीचे दिवस आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशा स्थितीत सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठ्यात अडचण होऊ नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनीही काही सुचना केल्या. अधिक्षक अभियंता विजय भटकर यांनी जिल्ह्याच्या एकूनच वीज व्यवस्थेची बैठकीत माहिती दिली. (प्रतिनिधी)