शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणाºया दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महिने कारावासाची ...

ठळक मुद्देआरोपी निर्दोष, साक्षीदार मात्र अडकले !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणाºया दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. हा निकाल गुरुवारी देण्यात आला.अंकित कैलास मुन (२०) रा. संकटमोचन, शुभम मधुकर उईके (२३) रा. उमरसरा असे शिक्षा झालेल्या साक्षीदारांची नावे आहे. या दोघांनी जय नगरनाईक (२०) रा. जगत मंदिर उमरसरा याच्या खुनातील आरोपींना वाचविण्यासाठी न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचे निष्पन्न झाले. या खोट्या साक्षीमुळे जयच्या खुनातील आरोपी सौरभ महादेव काळे, तेजस संजय गायकवाड, उत्तम आनंदराव जाधव तिघे रा. सुभाषनगर यांची २१ डिसेंबर २०१९ रोजी निर्दोष सुटका झाली. मात्र न्यायालयात साक्षीदारांनी खोटी साक्ष दिल्याचे निदर्शनास आले. त्यावरून विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी साक्षीदार अंकित मुन, शुभम उईके यांना न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३४४ प्रमाणे नोटीस बजावली व त्यांच्याकडून लेखी जबाब मागितला. साक्षीदारांनी दिलेला लेखी जबाब व न्यायालयात दिलेली साक्ष याची पडताळणी करण्यात आली. काही परिस्थितीजन्य पुरावेही पुढे आले. यामध्ये साक्षीदार खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा खटला सुरू करण्यात आला. न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचा गुन्हा सिद्ध झाला. यावरून जिल्हा सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांनी या साक्षीदारांना दोन महिने कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सात दिवस कारावासाची शिक्षा आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालय