"माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

By विलास गावंडे | Updated: January 2, 2024 22:35 IST2024-01-02T22:34:02+5:302024-01-02T22:35:11+5:30

युवतीला धमकी : युवकावर नेर पोलिसात गुन्हा दाखल

If you don't marry me, you will kill me; A case has been registered against the threatening young man | "माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

"माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

नेर (यवतमाळ) : माझ्याशी लग्न कर नाही तर फोटो व्हायरल करील, जीवानिशी ठार मारील, अशी धमकी देणाऱ्या युवकावर नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेर येथे मामाकडे शिक्षण घेत असलेल्या मुलीची एका तरुणाशी ओळख झाली. तो या मुलीचा पाठलाग करून तू मला आवडतेस, माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणून त्रास देत होता. २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता या मुलाने युवतीचा हात धरला. तू माझ्याशी लग्न कर अन्यथा जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. ५ जानेवारीला विवाह नोंदणीकरिता अमरावतीला ये नाहीतर माझ्याजवळ असलेले फोटो व्हायरल केले जाईल, असे धमकावले. यामुळे घाबरलेली युवती गावी गेली. मंगळवारी (२ जानेवारी) तिने नेर पोलिस ठाणे गाठून त्रास देणारा युवक अजय मेश्राम (२६) याच्याविरुद्ध तक्रार केली. यावरून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.

Web Title: If you don't marry me, you will kill me; A case has been registered against the threatening young man