शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

छत्रपती महोत्सवातून वैचारिक प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:47 PM

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक शिवजयंती समिती : निबंध, काव्य, नृत्य स्पर्धांसह व्याख्याने, पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येथील शिवतीर्थावर महोत्सवातील विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.१६ फेब्रुवारीला महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. १७ फेब्रुवारीला छत्रपती महोत्सवाचे रितसर उद्घाटन होणार आहे. यावेळी उद्घाटक माजी मंत्री संजय देशमुख असतील. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, स्वागताध्यक्ष बिपीन चौधरी राहणार आहे. महोत्सवात ‘शिवरायांची कृषीनीती व शेतकऱ्यांची आजची अवस्था’ या विषयावर पत्रकार प्रकाश पोहरे तसेच ‘शिवरायांच्या स्वप्नातील भारत व वास्तविकता’ या विषयावर अ‍ॅड. वैशाली डोळस यांचे व्याख्यान होणार आहे.समूह नृत्य स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे. त्यासोबतच विविध प्रकल्प अधिकारी नेमून शिवकाव्य स्पर्धा, शिव निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, शिवरत्न संगीत सम्राट स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. शिवाय रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजूंना कपडे, औषधी, फळवाटप अशी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे. महोत्सवादरम्यानच नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार, छत्रपती संभाजी राजे पुरस्कार, राजमाता जिजाऊ माँ साहेब महिला पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, तानूबाई बिरजे पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला डॉ. दिलीप महाले, बिपीन चौधरी, सुनील कडू, सुदर्शन बेले, पंकज राऊत, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, महेंद्र वेरुळकर, अंकुश वाकडे, डॉ. प्रदीप राऊत, सतीश काळे, शंतनू देशमुख, योगिराज अरसोड आदी उपस्थित होते.जयंती दिनी शोभायात्रा१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते, स्वागताध्यक्ष बिपीन चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सभापती विजय खडसे, जगदीश वाधवाणी, करुणा तेलंग, शुभांगी हातगावकर, पुष्पा राऊत, मुख्याधिकारी अनिल अढागळे, एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या उपस्थितीत माल्यार्पण होणार आहे. त्यानंतर मॅरेथॉन स्पर्धा होईल. शिवतीर्थावरून दुपारी भव्य शोभायात्रा निघणार आहे. बक्षीस वितरण कार्यक्रमाला आरडीसी नरेंद्र फुलझेले, एसडीओ स्वप्नील तांडगे, तहसीलदार शैलेष काळे मार्गदर्शन करणार आहे. अध्यक्षस्थानी विधान परिषद माजी उपसभापती माणिकराव ठाकरे राहतील.घराघरात शिवजयंती स्पर्धासार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने यंदा ‘घराघरात शिवजयंती स्पर्धा’ आयोजित केली आहे. इच्छुक नागरिकांनी स्वत:च्या घरीच शिवाजी महाराजांची प्रतिमा सजावट करून त्याचे फोटो आयोजकांना व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवायचे आहे. फोटो मिळताच आयोजकांची चमू संबंधितांच्या घरी जाऊन सजावटीचे परीक्षण करणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज