शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलनात वैचारिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:34 PM

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने दुसरे आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलन यवतमाळात होऊ घातले आहे.

ठळक मुद्देयवतमाळात आयोजन : २४ व २५ फेब्रुवारीला भरगच्च कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने दुसरे आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलन यवतमाळात होऊ घातले आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला होणाऱ्या संमेलनात वैचारिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी मिळेल, अशी माहिती रविवारी आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा परिषद बचत भवनात हे साहित्य संमेलन होणार आहे. प्रसिद्ध कवी प्रसेनजित ताकसांडे हे संमेलनाध्यक्ष असून माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य वामनराव तेलंग, डॉ. सुधीर पाठक, आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, बाजार समिती सभापती रवी ढोक, मजूर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विलास महाजन, भीमशक्ती संघटनेचे अविनाश भगत, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, कवी हेमंतकुमार कांबळे, प्रा. डॉ. अशोक कांबळे आदी उपस्थित राहणार आहे. बळी खैरे व संजय ओरके यांच्या पोस्टर पोएट्रीचे उद्घाटनही यावेळी होणार आहे.दुपारी नारायण जाधव येळगावकर यांचा आंबेडकरी काव्यधारा कार्यक्रम, तर सायंकाळी प्रा. विलास भवरे यांच्या अध्यक्षतेखाली महाकविसंमेलन होणार आहे. रविवारी डॉ. वामन गवई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात नूतन माळवी, प्रा. माधव सरकुंडे, अ‍ॅड. संदेश भालेकर, दशरथ मडावी, डॉ. अनिल काळबांडे सहभागी होणार आहेत. दुसºया सत्रात झुंझार कार्यकर्ते जिंदा भगत यांची प्रकट मुलाखत सतीश राणा घेणार आहेत. अ‍ॅड. सलीम शहा यांच्या न्यायासनाखाली श्रमिक लोकन्यायालय होणार आहे. त्यात श्रमिक पत्रकार संघाचे बल्लू भागवते, प्रजासत्ताक शिक्षक परिषदेचे संजय गुजर, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे महेश जोशी, अनुसूचित जाती जमाती संघटनांच्या परिसंघाचे एम. के. कोडापे, कास्ट्राईब रूग्णालयीन कर्मचारी संघटनेच्या वनमाला राऊत, मोलकरीण संघटनेच्या ममता भालेराव आदींवर खटला चालविण्यात येणार आहे. श्रमिकांची बाजू अधिवक्ता म्हणून संजय बोरकर व सुनिल पुनवटकर मांडणार आहे.पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष संजय मानकर, आनंद गायकवाड, गोपीचंद कांबळे, बळी खैरे, कवडूजी नगराळे, सुनिल भेले, सुमेध ठमके, संजय ढोले, संदीप नगराळे, सुनिल वासनिक, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, डॉ. युवराज मानकर, भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.