पत्नीचे प्रियकरासोबत फोटो पाहून पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 14:56 IST2023-07-07T14:53:28+5:302023-07-07T14:56:48+5:30
प्रियकराला अटक : मुद्दाम शेअर केले नको त्या अवस्थेतील फोटो

पत्नीचे प्रियकरासोबत फोटो पाहून पतीची आत्महत्या
नेर (यवतमाळ) : पत्नीसोबत नको त्या अवस्थेत असलेले फोटो प्रियकराने तिच्या पतीला शेअर केले. हे पाहून त्या पतीला धक्का बसला. त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास नेर पोलिसांनी केला. त्यातून हे सत्य पुढे आले. या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
अजय रामराव हातागळे (२७) या तरुणाने २६ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. नंतर अजयच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. पत्नीच्या प्रियकराने अजयला नको त्या अवस्थेतील फोटो मोबाइलवर सेंड केले. गावातीलच शैलेश संतोष शेलोकार याचे मृताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते.
यापूर्वीही त्यांना एकदा नको त्या अवस्थेत बघण्यात आले. मात्र तरीही सुधारणा झाली नाही. यातूनच अजयची मानसिकता बिघडली व त्याने आत्महत्या केली, अशी तक्रार अजयचे वडील रामराव हातागळे यांनी दिली. त्यावरून नेर पोलिसांनी आरोपी शैलेश शेलोकार याच्याविरुद्ध कलम ३०६ भादंविनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास नेर ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीपक बदरते, गजानन पत्रे करीत आहे.