डाळींचे भाव वाढल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 14:52 IST2021-02-06T14:51:44+5:302021-02-06T14:52:12+5:30
Yawatmal News ८८ ते ९० रुपये घाऊक बाजारात असणारी तूर डाळ १०१ ते १०२ रुपयापर्यंत गेली आहे. भविष्यात आणखी भाववाढीची शक्यता वर्तविण्यात आली असून, स्टॉकिस्ट सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसांत आणखी भाववाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

डाळींचे भाव वाढल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: गत एक सप्ताहापासून डाळीमध्ये एकतर्फी तेजी असल्याने तूर डाळीचे भाव एका आठवड्यात तब्बल १० ते १२ रुपये वाढून १०० रुपयांच्या वर गेले आहेत. ८८ ते ९० रुपये घाऊक बाजारात असणारी तूर डाळ १०१ ते १०२ रुपयापर्यंत गेली आहे. भविष्यात आणखी भाववाढीची शक्यता वर्तविण्यात आली असून, स्टॉकिस्ट सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसांत आणखी भाववाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
स्टॉकिस्ट आणि डाळ मिल यांची मागणी वाढली. कर्नाटकमध्ये तूर आवक घटली. मुंबई पोर्टवरील लेमन तूर ही संपत आल्याने देशी तुरीची मागणी वाढली. अशी अनेक कारणे आहेत की, ज्यामुळे तूर व तूर डाळ यांच्यात जबरदस्त तेजी आल्याचे दिसून येते. मूग मोगर घाऊक बाजारात १०० रुपयांवर गेला, तर मसूर डाळ ७२ रुपये, उडीद डाळ १०० रुपये, चणा डाळ ५४ रुपये, मूग डाळ चिल्टा ८८-९१ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
याशिवाय तेलात सोयाबीन १२० रुपये किलो, सूर्यफूल १३५ रुपये लिटर, फल्लीतेल १५० रुपये लिटर घाऊक बाजारात विक्री सुरू आहे. साखरेच्या दरातही ५० ते ७० रुपये अशी वाढ झाली आहे. तांदळामध्ये ४०० ते ५०० रुपये वाढ झाल्याने कोलम तांदूळ पाच हजारांवर पोहोचला आहे. याशिवाय गव्हामध्ये १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटल वाढल्याने रवा, आटा, मैदा याचे भाव वाढले आहे. जनावरांसाठी वापरण्यात येणारी सरकी ढेप दोन हजारांवरून अडीच हजारांपर्यंत पोहोचली आहे.