शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे ऐतिहासिक ‘रिंगण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

मुंगसाजी माऊलींच्या रथाला तुतारीची सलामी दिल्यावर जेसीबीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पालखी सोहळ्यात हरिपाठ मंडळ, भजनी मंडळ, रथावर अधिष्ठित माऊलींची प्रतिमा, बँड पथक, माऊलींचा रथ, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विविध झाँकी आदींचा समावेश होता.

ठळक मुद्देडोळ्याचे पारणे फेडले । तुतारीने सलामी अन् जेसीबीने पुष्पवृष्टी

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील गोळीबार चौकातील गोल रिंगणस्थळी शनिवारी सकाळी ९ वाजता जय मुंगसाजी माऊली नामाचा जयघोष करीत माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला. शेकडो भक्तासह अश्वांनी गोल रिंगण सोहळ्यात माऊलीच्या रथाला प्रदक्षिणा घातल्या. हा सोहळा याची डोळी पाहता यावा म्हणून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.मुंगसाजी माऊलींच्या रथाला तुतारीची सलामी दिल्यावर जेसीबीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पालखी सोहळ्यात हरिपाठ मंडळ, भजनी मंडळ, रथावर अधिष्ठित माऊलींची प्रतिमा, बँड पथक, माऊलींचा रथ, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विविध झाँकी आदींचा समावेश होता. यावेळी अनेक सामाजिक संघटना, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालखी सोबत असलेले लेझिम पथक, गोल रिंगण सोहळा, रांगोळी रेखाटन आदी कार्यक्रमांचे ड्रोण चित्रीकरण करण्यात आले. नंतर पालखीने धामणगावकडे मार्गक्रमण केले. पालखी मार्गावर माहुली, भुलाई, भांडेगाव, चिखली, मानकोपरा बोदेगाव, कोहळा येथे वारकऱ्यांना चहापाणी, नाश्ता, ऊसाच्या रसाची व्यवस्था माऊली भक्तांकडून करण्यात आली होती.मानकोपरा येथील हनुमान मंदिर येथे माऊली भक्तांकडून दुपारचे अन्नदान करण्यात आले. शहरातील काही डॉक्टरांनी पालखी सोबत वैद्यकीय सेवा दिली. पालखी मुंगसाजी महाराजांच्या मुख्य दरबारात पोहोचल्यानंतर आरती करण्यात आली. शेवटी दरबारात झालेला दिव्यांचा दीपोत्सव सोहळा व फटाक्यांच्या आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडले.यानंतर पालखी यात्रेत सहभागी माऊली भक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. माऊली भक्तांतर्फे विविध सेवा पदयात्रेमध्ये पुरविण्यात आल्या. रात्री मुंगसाजी माहुलीच्या दर्शनानंतर भाविकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

दारव्हा ते धामणगाव देव पालखी पदयात्रादारव्हा ते धामणगाव देव पालखी पदयात्रेचा शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानंतर मुंगसाजी महाराज संत मंदिर येथून पालखी पदयात्रेला प्रारंभ झाला. पालखी गोळीबार चौकातील गोल रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाली. तेथे अश्वांनी गोल रिंगणाच्या सोहळ्यात माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातल्या. मोठ्या गर्दीने या गोल रिंगणाचा सुखसोहळा डोळ्यात साठवून माऊलींच्या पालखी दर्शनाचा आनंद लुटला.

टॅग्स :Socialसामाजिक