महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 15:23 IST2020-11-14T15:22:08+5:302020-11-14T15:23:29+5:30
Accident : प्रविण हिरामण शिरभाते(४७) शुभम दत्तात्रय गादेवार (२५) असे मृताचे नाव आहे.

महामार्गावर अपघात; यवतमाळ येथील दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
यवतमाळ - येथील उज्वल नगर परिसरात हेमंत अपार्टमेंट येथे राहणाऱ्या दोघांचा मध्यरात्री दीड वाजता कार अपघातातमृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी आहेत. प्रविण हिरामण शिरभाते(४७) शुभम दत्तात्रय गादेवार (२५) असे मृताचे नाव आहे.
पंकज शहा व केतन वानोळे हे दोघे गंभीर जखमी आहेत. हे चारही मित्र उज्वल नगरमध्ये राहतात. शुक्रवारी दत्त चौक स्थित व्यापारी संकुलातील दुकानांची सफाई करून चौघेजण आर्णी रोडवरील हिवरी जवळ असलेल्या धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परत येत असताना कीन्ही उड्डाणपुलाच्या खाली हा अपघात झाला. भरधाव वेगाने असलेल्या कारने दुभाजकावर जोरदार धडक दिली. कार धडकेमुळे हवेत उसळली. कारचे इंजिन निखळून काही फूट अंतरापर्यंत जाऊन पडले. अपघातानंतर घटनास्थळावर मोठा आवाज झाला. तो ऐकून तेथील धाब्यावरील युवक बाहेर आले. अपघाताचे दृश्य पाहून त्यांचाही थरकाप उडाला. ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार करेवाड यांनी रात्री घटनास्थळ गाठले. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविले. रस्त्यावरील क्षतिग्रस्त वाहन, त्याचे सुटे भाग रात्रीच सुरक्षित ठिकाणी ठेवून वाहतूक सुरळीत केली.