शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:01 IST

जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता आले नाही. यामुळे पीक शेवटच्या घटका मोजत होते.

ठळक मुद्देराळेगावात दुकानात शिरले पाणी : यवतमाळ, कळंब, दारव्हा तालुक्यात धुव्वाधार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल १८ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. तर पेरणी बाद झालेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करण्यासाठी या पावसाची मोठी मदत होणार आहे. राळेगाव तालुक्यात अतिपाऊस झाल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले.जिल्ह्यात १५ जूनला पाऊस बरसला. त्यानंतर बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उन्हाचा पारा अधिक असल्याने ही धडपड व्यर्थ जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. अनेकांना पाण्याची व्यवस्था असतानाही ओलित करता आले नाही. यामुळे पीक शेवटच्या घटका मोजत होते. शुक्रवारी बहुतांश भागात पाऊस बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उणे पावसाने शेतकऱ्यांची चांगली गोची झाली आहे. शुक्रवारी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उत्पन्न प्रभावित होण्याचाही धोका वर्तविला जात आहे.गुरूवारी रात्री राळेगावात अर्ध्या तासात ६३ मिमी पावसाची नोंद झाली.हा पाऊस जोरदार होता. त्रिमूर्ती कॉम्पलेक्सच्या दुकानात हे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे ५० लाखांचे नुकसान झाले. राळेगावात जोरदार पाऊस बरसल्याने कृषीसेवा केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या दुकानांना याचा फटका बसला. कळंबच्या थाळेगाव पुनर्वसन येथे अनेक घरात पाणी घुसले. कामठवाडा येथे पूल वाहून गेला.मासिक सरासरीच्या केवळ २३ टक्के पाऊसजिल्ह्यात सरासरी १० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये यवतमाळ १.९ मिमी, बाभूळगाव १५.७ मिमी, कळंब ३७.४, दारव्हा ५.३, दिग्रस ९.२, आर्णी १०.२, नेर ०.६, पुसद १०.६, उमरखेड १, महागाव १४, वणी २३, मारेगाव ३, झरी २, केळापूर ४, घाटंजी ५ आणि राळेगाव १६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या केवळ २३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद पिकांसाठी चिंताजनक आहे.

टॅग्स :Rainपाऊस