हृदयद्रावक! विद्युत रोहित्रावर काम करताना वायरमनचा मृत्यू
By विलास गावंडे | Updated: October 8, 2023 19:31 IST2023-10-08T19:31:15+5:302023-10-08T19:31:25+5:30
विद्युत रोहित्रावर काम करताना शॉक लागून खाली कोसळल्याने वायरमनचा मृत्यू झाला.

हृदयद्रावक! विद्युत रोहित्रावर काम करताना वायरमनचा मृत्यू
जोडमोहा (यवतमाळ) : विद्युत रोहित्रावर काम करताना शॉक लागून खाली कोसळल्याने वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास खोरद-शेळी शिवारात घडली. अमोल गिरीधर हिवरकर (४०), रा.यवतमाळ, असे मृताचे नाव आहे.
विद्युत कंपनीच्या जोडमोहा (ता.कळंब) येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात कार्यरत असलेले अमोल हिवरकर हे खोरद (शेळी) शिवारात असलेल्या विद्युत रोहित्रावर काम करत होते. त्यावेळी त्यांचा वीज प्रवाह सुरू असलेल्या तारांना स्पर्श झाला. झटका बसताच ते खाली कोसळले. लगेच गावकऱ्यांनी त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, लहान भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.