शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सैनिक निघाले तापाशी लढायला

By admin | Updated: November 4, 2014 22:47 IST

डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत.

यवतमाळ : डेंग्यू, मलेरिया, चंडिपुरा, चिकन गुण्या, व्हायरल फिवर आदी प्रकारच्या तापाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. या तापाशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाचे सैनिक सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात या विभागाकडून ताप उद्रेक नियंत्रण धडक मोहीम राबविली जात आहे. गावोगावी मोहीम राबविली जात असल्याने या सैनिकांना ताप नियंत्रणात येईल, असा विश्वास आहे. गावातील उकिरडे, सांड पाण्याच्या तुंबलेल्या नाल्या, जागोजागी तयार झालेली गटारं यामुळे तापाचा उद्रेक वाढला आहे. पावसाळा संपून महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही ग्रामपंचायती किंवा आरोग्य विभागाने तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्याविषयी पावले उचलली नाही. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला. गावागावात विविध प्रकारच्या तापाचे रुग्ण वाढत आहे. यात डेंग्यूसदृश आजाराचेही रुग्ण आहेत. रुग्णांमुळे शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहे. आता डासांवर नियंत्रण हाच एक प्रभावी उपाय असल्याने आरोग्य विभागाने गाव रोगराईमुक्त करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. यासाठी पथक निर्माण करण्यात आली. आरोग्य सैनिक गावोगावी जावून टेमीफॉसचा वापर, रक्त नमुने घेणे, नाले-गटारे साफ ठेवणे, घरोघरी स्वच्छता या बाबत जागृती करत आहेत. उकिरडे गावापासून दूर असावे असा सल्ला दिला जात आहे. कित्येक वर्षांपासून गावालगतचे उकिरडे दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना होत नाही. शिवाय आरोग्य विभागालाही याविषयी कुठलेही सोयरसुतक नव्हते. आता मात्र हा विभाग खडबडून जागा झाला आहे. गावागावात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले जात आहे. (वार्ताहर)