शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारहाण करून मित्राच्या खोलीत सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पती सदर मित्राला सोबत घेऊन थेट घरातच दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत त्या दोघांनी यथेच्छ पार्टी झोडली. त्यानंतर मित्र वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संंबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिने नकार देताच मारहाण करीत तिला मित्राच्या रुममध्ये फरफटत नेऊन ढकलून दिले आणि स्वत: पतीनेच रुमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने बिटरगाव ठाण्यात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : मित्राला फोन लावून त्याच्याशी बोल म्हणून पत्नीला आग्रह धरला. ती ऐकत नाही असे दिसल्यावर मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्राला घरी बोलावून तो थांबलेल्या खोलीत पत्नीला फरफटत नेऊन सोडले. दारूच्या नशेत पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आल्यानंतर  बिटरगाव पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे १७ नोव्हेंबरच्या रात्री हा धक्कादायक गुन्हा घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बिटरगाव पोलिसात तक्रार दिली आहे.  पती दारू पिऊन घरी आला व त्याच्या एका मित्राला फोन लावून देऊन तू त्याच्याशी बोल, असा आग्रह त्याने धरला. पत्नीने बोलण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पतीच्या भीतीने त्याच्या मित्राशी ती फोनवर बोलली. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पती सदर मित्राला सोबत घेऊन थेट घरातच दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत त्या दोघांनी यथेच्छ पार्टी झोडली. त्यानंतर मित्र वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संंबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिने नकार देताच मारहाण करीत तिला मित्राच्या रुममध्ये फरफटत नेऊन ढकलून दिले आणि स्वत: पतीनेच रुमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने बिटरगाव ठाण्यात दिली. त्यावरून या प्रकरणात वरील दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवघ्या दोन तासात दोघांनाही केली अटक - घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. के. ए. धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रदीप पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासामध्ये अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी