शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

खडकी येथे ‘एचबीटी’ बियाणे लागवड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:36 IST

शेतकरी संघटनेने सोमवारी लगतच्या खडकी येथे शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनाअंतर्गत अप्रमाणित जैविक संशोधित कपाशी बियाण्यांची राजू झोटींग यांच्या शेतात लागवड करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देप्रशासनाची तारांबळ : रावेरीत सत्याग्रह सभा

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : शेतकरी संघटनेने सोमवारी लगतच्या खडकी येथे शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनाअंतर्गत अप्रमाणित जैविक संशोधित कपाशी बियाण्यांची राजू झोटींग यांच्या शेतात लागवड करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.शेतकरी संघटनेने एचबीटी बियाणे लागवड आंदोलन करून शासनाला या बियाण्यांची परवानगी देण्याची मागणी केली होती. देशातील शेतकऱ्यांना शेतीत नवीन जैविक तंत्रज्ञानाने विकसित बियाणे निवडीचे स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. त्यासाठी सोमवारी राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सीता मातेला साकडे घालून या बियाण्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खडकी येथील राजू झोटींग यांच्या शेतात एचबीटी बियाण्यांची लागवड करण्यात आली. हे आंदोलनामुळे रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा तयार होती. कृषी विभागासह महसूल विभाग आणि पोलीस कर्मचारीही शेतात पहारा देत होते.आंदोलक बियाणे शेतात फेकून पसार झाले. कृषी विभागाने हे बियाणे ताब्यात घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी दिली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांच्यासह कृषी व पोलीस कर्मचारी, तलाठी उपस्थित होते.या आंदोलनात माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सतीश दाणी, प्रज्ञा बापट, विजय निवल, बबनराव चौधरी, नितीन देशमुख, गणेश मुटे, कमलाकर भोयर, हेमराज इखार, अक्षय महाजन, गोपाल भोयर, राजेंद्र व्यापारी, कुंडलिक झोटींग, मंदा वाभिटकर, सिंधु इखार, सुमन काळे, यशोदा खेवले, सुमित्रा भोयर, चंद्रकला वाभिटकर, संगीता बचाटे, नारायण बोरकर, भास्कर पाटील, जीवन इखार, प्रदीप भोयर, किशोर राजूरकर, महेश आवारी, बंडू यरगुडे, गजानन ठाकरे, अमोल नंदूरकर, गोपाल नंदूरकर, विठ्ठल फटींग आदींनी सहभागी घेतला.