शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

किनवट परिसराला वादळाने झोडपले

By admin | Updated: June 11, 2017 00:21 IST

शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा परिसरातील अनेक गावांना तडाखा बसला. बियाणे,

लोकमत न्यूज नेटवर्क डोंगरखर्डा : शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा परिसरातील अनेक गावांना तडाखा बसला. बियाणे, खत व सिमेंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सराटी मार्गावर झाड कोसळल्याने मार्ग बंद झाला होता. किनवट येथे ४० घरांचे नुकसान झाले. दोन घरे जमिनदोस्त झाली. घरकुलाच्या बांधकामासाठी आणलेले सिमेंट पावसामुळे खराब झाले. शेतात टाकण्यासाठी आणलेली बियाणे, खतांची नासाडी झाली. घरामध्ये पाणी शिरल्याने धान्य भिजले. वादळाने टीनपत्र उडाल्याने जनावरांना इजा झाली. गावातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. विद्युत तारा ठिकठिकाणी तुटून पडल्या आहेत. शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेले शौचालयही कोसळले. गारांसह पाऊस झाल्याने शेतात शेतकरी, शेतमजुरांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकल्यांनी जीव वाचविण्यासाठी एकमेकांचा आधार घेतला. पिंपळशेंडा येथे अनेक घरावरील टीनपत्रे उडाली. विद्युत खांब वाकले, विद्युत तारा कोसळल्या. पाऊस आणि वादळामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. आज संपूर्ण दिवसभर कामांचीही गती कमी झाली होती. संबंधित विभागाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दारव्ह्यात पावसाची जोरदार हजेरी दारव्हा : शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे प्रचंड उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दोन तास कोसळलेल्या या पावसाची ९६ मि.मी. एवढी नोंद झाली आहे. मध्यरात्री विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसाने नगरपरिषद प्रशासनाची झोप उडविली. शहरातील नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी पाणी अडल्याने रस्ते आणि खुल्या जागांना नाल्याचे स्वरूप आले होते. पाणी साचल्याने काही जणांच्या घरातसुद्धा पाणी शिरले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नदीनाल्यांनाही पूर आला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकरी सुखावला आहे.