Hailstorms with heavy rainfall in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसासह गारांचा वर्षाव

यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसासह गारांचा वर्षाव


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास वादळी पावसासह गारा पडल्या. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वेगाव, वरुड, गवराळा, लाखापूर आदी परिसरात संध्याकाळी प्रथम वादळी वारा सुरू झाला. नंतर काही वेळातच जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यातच मोठ्या आकाराच्या गारांचाही वर्षाव होऊ लागला. या गारपिटीमुळे तालुक्यातील आंबा व अन्य फळपिकांसह गहू व हरभरा पिकालाही मोठा फटका बसला आहे.

Web Title: Hailstorms with heavy rainfall in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.