वडगाव येथे सामूहिक विवाह मेळावा

By Admin | Updated: May 13, 2016 02:45 IST2016-05-13T02:45:30+5:302016-05-13T02:45:30+5:30

संकल्प बहुउद्देशिय संस्था वडगाव रोड, यवतमाळच्यावतीने संत नामदेव महाराज सभा मंडप जांब रोड,....

Group Weddings in Wadgaon | वडगाव येथे सामूहिक विवाह मेळावा

वडगाव येथे सामूहिक विवाह मेळावा

यवतमाळ : संकल्प बहुउद्देशिय संस्था वडगाव रोड, यवतमाळच्यावतीने संत नामदेव महाराज सभा मंडप जांब रोड, वडगांव येथे मंगळवारी सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पी.डी.देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग खांदवे, किशोर थोटे, विलास चावरे, श्रीराम कापसे, तुकाराम भगत, अश्वजीत भगत, वसंत देवतळे व अशोक काळमोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पांडुरंग खांदवे, पी. डी. देशमुख, किशोर थोटे व अश्वजीत भगत यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात अंध जोडप्यांचे सुद्धा लग्न लावण्यात आहे. या वेळी खांदवे यांनी वधुवरांना भेटवस्तू प्रदान केली. विवाहविधी तुकाराम भगत यांनी पार पाडली.
प्रास्ताविक अशोक काळमोरे यांनी केले. मेळाव्यासाठी प्रवीण भोयर, विलास भवरे, वसंत देवतळे, अशोक काळमोरे, प्रशांत देवतळे, सुरज भगत, अरुण शरदकार ईत्यादींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Group Weddings in Wadgaon