शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 4, 2014 22:48 IST

वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

नांदेपेरा : वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.पिकांना योग्य दर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने अद्याप पाऊल उचलले नाही. कापूस, सोयाबिनचा लागवड खर्च भरमसाठ वाढला आहे. निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लावगड खर्च आणि दरात तफावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे कापसाला किमान पाच हजार रुपये, तर सोयाबीनला किमान चार हजार रूपये प्रती क्विंटल हमी भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़ शासन दरबारी शेतकरी हिताचा निर्णय तत्काळ मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ हमी भावासाठी शेतकऱ्यांनाच तडजोड करावी लागते़ शेतकऱ्यांना नेहमी संघर्ष का करावा लागतो, हा संघर्ष आमच्याच पदरी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. दूषित हवामान, वातावरणातील बदल, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी, यामुळे ओढवलेल्या नापिकीने बळीराजा त्रस्त आहे. या आपत्तींमुळे एकरी उत्पादनात घट येऊन उत्पादन खर्चही वाढतो. सध्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल केवळ तीन हजार ५०० रूपये आहे. प्रत्यक्षात कापूस सहा रूपये प्रती किलोप्रमाणे वेचावा लागतो. एका क्विंटलला किमान ६00 रुपये वेचणीवर खर्च होतात. तत्पूर्वी निंदनासाठी किमान १५० रूपये मजुरी, फवारणीसाठी ३०० रूपये, तर लागवडीसाठी किमान हजार रुपयांचा खर्च होतो. तसेच ८०० रुपयांचे बियाणे, दीड हजारांची खते, घ्यावी लागतात. असा एकूण तीन हजार ९५० रुपयांच्या जवळपास खर्च एका क्विंटलसाठी होतो. (वार्ताहर)