शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचारी व शिक्षक २६ ला संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरतानाच संघटनेने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांचाही समावेश आपल्या मागण्यांमध्ये केला आहे. अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा, बेरोजगारांना दरमहा सात हजार ५०० रुपये भत्ता मंजूर करा, प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा दहा किलो अन्नधान्य पुरवठा करा, प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगामार्फत किमान २०० दिवसांचा रोजगार मिळेल, असे धोरण लागू करा आदी बाबी निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रलंबित विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी २६ नोव्हेंबर रोजी संप करणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.१९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करा, खासगीकरण-कंत्राटीकरण धोरणे रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करा, कामगार-कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करा, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर      करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे   तात्काळ भरा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा, वेतनश्रेणी त्रूटी    दूर करण्यासंदर्भात बक्षी            समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करा आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश वैद्य, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बुटे, किशोर पोहनकर, गजानन टाके, प्रमोद पोहेकर, आशीष जयसिंगपुरे, रवी चव्हाण, अतुल इळपाते, नितीन जीचकार, वैभव पवार, अर्चना अलाेणे, प्रणिता ठवकार आदींनी निवेदन दिले.

शेतकरी बेरोजगारांचेही प्रश्न सोडवासरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरतानाच संघटनेने शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांचाही समावेश आपल्या मागण्यांमध्ये केला आहे. अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करा, बेरोजगारांना दरमहा सात हजार ५०० रुपये भत्ता मंजूर करा, प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा दहा किलो अन्नधान्य पुरवठा करा, प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगामार्फत किमान २०० दिवसांचा रोजगार मिळेल, असे धोरण लागू करा आदी बाबी निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रश्नांना तातडीने निकाली काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप