शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गौरव सोहळा

By admin | Updated: January 19, 2017 01:00 IST

ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातील ज्येष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.

यवतमाळ : ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातील ज्येष्ठ सभासदांचा शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. तसेच कॅरम स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. येथील ज्येष्ठ नागरिक भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक मनोज मुधोळकर, संगीता सव्वालाखे, प्रमोद गाडबैले आदी उपस्थित होते. वसुधा पांडे यांनी स्वागतगीत तर सुरेश भिरंगी यांनी मंडळाचे ‘खरा तो एकची धर्म’ हे प्रार्थना गीत सादर केले. मंडळाचे अध्यक्ष बळवंतराव चिंतावार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. सचिव भाऊराव वाकडे यांनी मंडळाच्या गतवर्षीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रशांत कदम यांनी पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनावरील चित्रफितीचे प्रक्षेपण केले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. संचालन मंडळाचे सहसचिव विजय उपलेंचवार यांनी केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मानवसेवा समितीचे अध्यक्ष तथा मंडळाचे सदस्य अ‍ॅड. गोपाळराव जायले होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. या सत्रात कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. संचालन वसंत पांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरविंद डगावकर, विठ्ठल व्यवहारे, विजय गंगमवार, श्रीराम भास्करवार, विनोद सहस्त्रबुद्धे, वासुदेव कांबळे, शीला कांबळे, प्रकाश दामले, नीळकंठ वानखेडे, शुभांगी सहस्त्रबुद्धे, राजन टोंगो, दिगंबर चिंतलवार आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)