शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

Ganesh Chaturthi 2018; यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये ११४ वर्षांपासून सर्वधर्मसमभाव परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:05 AM

पुसद शहरातील पुष्पावंतीनगरीत गणेशोत्सवात तब्बल ११४ वर्षांपासून सर्वधर्म समभावाची परंपरा जोपासली जात आहे.

ठळक मुद्देमानाचा गणबादेव गणपती हटकेश्वर वॉर्डात दरवर्षी स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुसद शहरातील पुष्पावंतीनगरीत गणेशोत्सवात तब्बल ११४ वर्षांपासून सर्वधर्म समभावाची परंपरा जोपासली जात आहे. पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ पासून पुसदचे ग्रामदैवत म्हणून ख्यातीप्राप्त मानाचा गणबादेव गणपतीची स्थापना केली जाते. यातून ही परंपरा जोपासली जात आहे.शहराची जीवनदायिनी म्हणून पूस नदीची ख्याती आहे. या नदीकाठावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरी पूत्र धारू पाटील यांनी गणबादेवाची पहिल्यांदा स्थापना केली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व सध्या शरद पाटील गणबादेवाची परंपरेने स्थापना करीत आहे. गणबादेवाच्या स्थापनेसाठी खास रथाची निर्मिती करण्यात येते. यावर्षी किनवट येथील मुस्लीम कारागिर सरफराज शेख याने रथाची निर्मिती केली आहे. या रथावरून वाजतगाजत गणबादेवाची मिरवणूक काढून स्थापना केली जाणार आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून भोई समाजबांधव हा रथ ओढत आहे.पुसदचे ग्रामदैवत म्हणून आता गणबादेवाची गणना केली जाते. हा गणबादेव गणपती सामाजिक सलोख्याचा समाजापुढे आदर्श ठेवत आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातूनही सर्वधर्म समभावाचा संदेश दिला जातो. याच गणपतीने राज्य शासनाचा उत्कृष्ट गणपती पुरस्कार पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. येथील ग्रामदैवत असलेल्या गणबादेवाची कीर्ती दिवसेंदिवस शहरासह इतरत्र पसरत आहे. यामुळे भाविकांची संख्या वाढत आहे. सध्या गणबादेव गणेश मंडळाची धुरा शरद पाटील, सुधाकर वाशीमकर, चंद्रकांत शेता, अनिल पाटील, सतीश पंडितकर, सुदेश सांबरे, सुरेश चौधरी, संजय पाटील, ऋषीकेश पंडितकर, दीपक देशमुख, अ‍ॅड.विनोद पाटील आदी सांभाळत आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच हाच गणबादेव अग्रस्थानी असतो, हे विशेष! त्याला बघण्यासाठी दरवर्षी मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी उसळते.

१४ किलो चांदीचे सिंहासनगणबादेव गणेश मंडळाने गणबादेवाची स्थापना करण्यासाठी तब्बल १४ किलो चांदीचे रत्नजडित सिंहासन बनविले आहे. गेल्या काही वर्षांपासून याच सिंहासनावर गणबादेवाची स्थापना केली जाते. गणबादेवाला ११ ग्रॅम सोन्याचे दंत बसविले जातात. त्यामुळे गणबादेव पुसदकरांच्या गळ्यातील ताईत ठरले आहे. गणबादेवाच्या दर्शनासाठी तालुक्यासह परिसरातील नागरिक दरवर्षी गर्दी करतात.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८