शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: October 17, 2016 18:13 IST

विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेले आश्रमशाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्याचा आदेश सोमवारी शासनाने काढला आहे.

आश्रमशाळांचे कर्मचारी : पाच महिन्यांपासून आर्थिक कोंडीविलास गावंडे , यवतमाळ विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेले आश्रमशाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्याचा आदेश सोमवारी शासनाने काढला आहे. समायोजन होईपर्यंत त्यांना वेतन दिले जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील एक हजार २०० शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात सर्वाधिक ४०० शिक्षक-कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातील आहे.समाजकल्याण विभागाच्या ५२६ प्राथमिक आणि २९६ माध्यमिक अशा ८२२ आश्रमशाळांतील शिक्षक-कर्मचारी २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरले होते. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या या आश्रमशाळा आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने वर्ग आणि तुकड्या कमी झाल्या होत्या.

दरम्यान, शासनाने १ एप्रिल २०१६ रोजी ह्यकाम नाही-वेतन नाहीह्ण हे धोरण जाहीर केले. यानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन हे धोरण जाहीर झाल्यापासून थांबविण्यात आले.

वेतन बंद झाल्याने राज्यातील १२०० शिक्षक-कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी सुरू झाली. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने विविध माध्यमातून न्याय मागितला. ह्यकाम नाही-वेतन नाहीह्ण या धोरणात बदल करून शुद्धिपत्रक काढण्याची मागणी लावून धरली. परंतु शासन आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर या संघटनेने न्यायालयाचे दार ठोठावले. उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने आपल्या धोरणात बदल करावा, असा आदेश दिला. यासाठीचे शुद्धिपत्रक काढण्याकरिता १७ आॅक्टोबर अखेरची तारीख देवून, अन्यथा एकतर्फी निर्णय दिला जाईल, असे ठणकावले. अखेर शासनाने सोमवार, १७ आॅक्टोबर रोजी शुद्धिपत्रक काढले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन समायोजन होईपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांचे समायोजन आश्रमशाळांमध्ये प्राधान्याने करावे, असेही या शुद्धिपत्रकात नमूद केले आहे. शिक्षणहक्क कायदा लागू व्हावाशिक्षणहक्क कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अपेक्षित आहे. सामाजिक न्याय विभागाला हा कायदा लागू नसल्याने ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक दिला जातो. विविध कारणांमुळे विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. शिक्षणहक्क कायदा सामाजिक न्याय विभागाला लागू झाल्यास अतिरिक्तचा प्रश्न राहणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष भूपाल राठोड यांनी सांगितले. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी गेली सात महिन्यांपासून हा लढा सुरू होता, असे ते म्हणाले.