शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा रोखण्यासाठी चार हजार अँटी डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:05 IST

फवारणीच्या विषबाधेचे प्रमाण राज्यभरात वाढत आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्राण वाचविण्यासाठी पाम इंजेक्शनचे अँटी डोज राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे‘हाफकिन’चा दिलासा वैद्यकीय महाविद्यालयांना २०० कोटींच्या औषधांचा पुरवठा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विषबाधा रोखण्यासाठी अँटी डोजचे पाम इंजेक्शन, विविध दुर्धर आजार, तसेच दैनंदिन लागणाऱ्या २०० कोटींच्या औषधी ‘हाफकिन’ने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना पुरविल्या आहेत. यामुळे रुग्णांची हेळसांड थांबणार आहे.फवारणीच्या विषबाधेचे प्रमाण राज्यभरात वाढत आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्राण वाचविण्यासाठी पाम इंजेक्शनचे अँटी डोज राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये ४००० इंजेक्शन यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले. या महाविद्यालयांना इतक्या मोठ्या प्रमाणात या औषधी प्रथमच पुरविण्यात आल्या आहेत. यासोबतच दुर्धर आजारावरील औषधी आणि दैनंदिन औषधांचा पुरवठाही हाफकिनने १६ वैद्यकीय महाविद्यालयांना केला आहे. आता रुग्णांना औषधांसाठी खासगी दुकानांमध्ये धाव घ्यावी लागणार नाही. बहुतांश औषधी वैद्यकीय महाविद्यालयातच उपलब्ध होणार आहे. यामध्ये टीटी, आयव्ही, रक्त तपासणी किट यासारख्या महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.इतर जिल्ह्यांची यवतमाळकडे धावविषबाधा प्रकरणात यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतंत्र कक्ष उघडला आहे. १० आयसीयू युनिट येथे तयार करण्यात आले असून पाच तज्ज्ञ डॉक्टरांची चमू तेथे तैनात करण्यात आली. गत तीन वर्षात ७२२ रूग्णांचे प्राण या वैद्यकीय महाविद्यालयाने वाचविले आहे. फवारणी बाधितांचा आकडा मोठा आहे. यामुळे विदर्भातील इतर जिल्ह्यातून विषबाधीत रूग्ण यवतमाळकडे रेफर केले जात आहेत. यामध्ये किनवट, नांदेड, वाशिम जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.दोन औषधांवर बंदीचा प्रस्तावशेतकरी फवारणी करताना गॅस पॉयझन औषधांचा वापर करीत आहे. या औषधांमुळे श्वासातून आणि त्वचेतून शरीरात विष पोहचल्याने विषबाधा होत आहे. अशा औषधांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाला पाठविला आहे.विषबाधा, दुर्धर आजार, दैनंदिन औषधींचा पुरवठा राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना करण्यात आला आहे. २०० कोटी रुपयांच्या या औषधी महाविद्यालयात पोहचल्या आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील औषध टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.- डॉ. राजेश देशमुख, संचालक, हाफकिन, मुंबई

टॅग्स :Healthआरोग्य